इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- इंदापूर तालुक्यात मृग नक्षत्राच्या सुरवातीस पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतकरी जमिनीला वापसा येण्याची प्रतीक्षा करत आहे. त्यानंतर खरीप हंगामातील पेरणीला वेग येईल, असे चित्र दिसत आहे.
इंदापूर तालुका रब्बी हंगामाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा, ऊस यांसारखी पिके शेतकरी घेतात. नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच १ जून ते २१ जूनच्या कालावधीत २३३ मिलिमीटर म्हणजे सरासरी ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकरीवर्ग पेरणी करण्यात मग्न झाला आहे. आजपर्यंत साडेनऊशे हेक्टर मका, पन्नास हेक्टर बाजरीची पेरणी झाली आहे.
एक दोन दिवसांत युरिया खताची रेल्वे पोहोचणार आहे. त्यानंतर तालुक्यातील सर्व खतांच्या दुकानात मुबलक प्रमाणात खत उपलब्ध होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी दिली. संपूर्ण तालुक्यात बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तालुक्यातील ४०२ दुकानांत भरपूर प्रमाणात बियाण्याचा साठा आहे.
प्रामुख्याने मका, बाजरी याची विविध वाण उपलब्ध आहे. ॲडवनटा - (७५१,७४१,७५६,७५९), पायोनियर ३५, २४, बिडीकॉल्प हायटेक ५१०१, ५१०२, एनके ६२४० यासारखी अनेक वाण उपलब्ध आहेत. बाजरीची महिको व सिंनझंटा या कंपनीचे वाण उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना दुकानदारांकडून पावती व बॅच नंबर घ्यावा. शेतकऱ्यांनी खरेदी पावती जपून ठेवावी असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फडतरे व विस्तार अधिकारी युनूस शेख यांनी केले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा