*सांगली ----पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला
काळ्या रंगाने "गुणवत्तेची" तुलना नको
प्रत्येक तरुणाला "विवाह" करताना गोरी मुलगी हवी आहे. तरुण स्वतः काळ्या रंगाचा असला तरी लग्न करायचं असेल तर त्याला मुलगी रंगाने गोरीचं पाहिजे . प्रत्येकाला गोरी मुलगी हवी असेल तर काळ्या आणि सावळ्या मुलींनी काय करायचे ?? "परमेश्वराने" काळा रंग दिला असेल तर त्या तरुणीचा त्यात काय दोष ???
तरुणांनी देखील आपल्यात असेलेले अवगुण - व्यसन आणि वाईट सवयी याचेदेखील "आत्मपरीक्षण" करणे हितावह ठरेल. कारण तरुणी सावळी - काळी आहे हे सांगताना व इतरांची मापे काढतांना अनावधाणाने आपल्यातील "वाईट प्रवृत्तीला" आपण झाकून तर ठेवत नाही ना ?? हे पाहावे लागेल .इतरांकडे 1 बोट दाखवताना 4 बोटे आपल्याकडे असतात याचा विसर पडायला नको.
चॉकलेटला जर "कव्हर" नसेल,ते उघडे असेल तर त्याची चव चाखायची इच्छा प्रत्येकाला होते. परंतु त्याच चॉकलेटला जर कव्हर असेल,तर इतरांची नजर तेथे वारंवार जातं नाही.
आपली संस्कृती व आपल्या अब्रू चे "संरक्षण" करणाऱ्या काळ्या सावळ्या तरुणींमध्येही तोच स्पार्क , तेच लावण्य ,तिचं अदा आणि तेच अभिजात "सौन्दर्य" असते. फक्त्त त्यांना ओळखणारा " रत्नपारखी हवा. खुबसूरती "सावले रंग में हें,
गोरे तो "आझादी" से पहलेभी बेवफा* थे और "आज" भी हें !
गोऱ्या - सावळ्या रंगाच्या नादात, मानसिक* त्रासाला कंटाळून एखादी सावळी तरुणी चुकीचे पाऊल उचलून " लव्हमॅरेज " किंवा आंतरजातीय विवाह केल्यावर तिच्यावर टीका केली जाते. परंतु योग्यवेळी समाजाने, युवकांनी रंगाबाबत "तडजोड" केली तर असे प्रकार रोखता येऊ शकतात हेही आज "निदर्शनास" येत आहे .
सावळा रंग कृष्णाचा ..आणि चहा चा रंग ही सावळा ..या दोघांचे "लाखो" चाहते ..!
"वधू -वर सूचक मंडळ" किंवा मॅरेज ब्युरो मध्ये सावळी मुलगी कोणालाच नको असते .असे का ??? जर काळ्या - सावळ्या तरुणींना समाजाने धिक्कारले तर येणारा "काळ" तुम्हाला कधीच "माफ" करणार नाही. ज्या "कृष्णाचा" रंग सावळा असेल आणि आपण पीत असणाऱ्या रोजच्या चहा चा "रंग" देखील सावळा असेल तर सावळ्या मुलींशी इतकी घृणा का ???
सावळ्या रंगाच्या स्मिता पाटील रेखा , मोसमी चटर्जी, काजोल , शिल्पा शेट्टी , यासारख्या अनेक गुणवान अभिनेत्री यशस्वी झाल्या आहेत . अनेक डॉक्टर ,वकील ,शिक्षक ,
इंजिनियर IPS , IAS अधिकारी उच्चपदावर आहेत. वास्तविक पालक आपल्या मुलींसाठी स्थळ पाहताना तरुणांच्या पालकांशी संपर्क साधतात. 10-15 पालकांशी संवाद साधूनही, तुमची मुलगी थोडी सावळी आहे , "मॅच" होत नाही म्हणून स्थळ "नाकारले" जाते. मुलीच्या पालकांच्या "मनावर" किती ओरखडे पडत असतील, त्यांच्या भावनांना किती "ठेचं" लागत असेल त्यांच्या हृदयाला किती वेदना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी .त्याशिवाय या प्रकाराचा त्या उपवर "तरुणीला" किती "त्रास" होत असेल ??? याचा ही विचार व्हायला हवा .
लडकी की सिरत देखो ..सुरत नहीं ...!
वास्तविक गोऱ्या तरुणींना अजिबात "विरोध नाही. त्यांचे सौन्दर्य ही "फुलासारखे" देखणे आणि दिलखेचक असते . गोऱ्या तरुणीही "नीटनेटका" संसार चालवतात त्यात "दुमत" नाही .
परंतु ज्या "गोऱ्या" रंगाची आजचे तरुण "हाव" आणि "अपेक्षा" करतात ,त्या गोऱ्या रंगाच्या तरुणी स्वभावाने संवेदनशील -प्रेमळ आणि सहृदयी असतीलच याची गॅरंटी (खात्री ) कोण देऊ शकेल का ??? गोऱ्या मुली सासू -सासऱ्यांना सांभाळतील हे खात्रीने कोण सांगू शकेल का ??? गोऱ्या रंगाचा अहंकार असणाऱ्या गोऱ्या तरुणी नवऱ्याला आणि सासू सासऱ्याला घराच्या एका "कोपऱ्यात" ठेवून अधिकार गाजविल्याचे अनेक प्रकार घडलेले नाहीत का ?? आणि दुसरीकडे सावळ्या मुली "घर- संसार "नेटकेपणे चालवून नवऱ्याला "साथ" देत घराचे स्वर्ग करण्याचे शेकडो उदाहरणे भारतात आढळतात. तात्पर्य लडकी की सिरत देखो ...सुरत नहीं.
सावळ्या मुलीचे लग्न ठरत नसेल तर त्या मुलीला आर्थिक परिस्थिती गरीब असतानाही फक्त्त आणि फक्त्त आपल्या मुलीचे लग्न ठरावे म्हणून उच्चशिक्षण दिले जाते. निदान या शिक्षणाकडे पाहून तरी लग्न "जमेल" अशी पालकांची आशा असते. शिवाय ती स्वतःच्या "पायावर" उभी राहू शकेल व आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल हीदेखील आशा असते .सावळ्या रंगाच्या मुली या नवऱ्याशी "इमान" राखणाऱ्या व "एकनिष्ठ" असतात. त्यामुळे "रंगा" पेक्षा तरुणीचा "स्वभाव" पाहणे गरजेचे आहे .तरुणांनी याचाही गांभीर्याने विचार करावा.
"गोरे रंग पे ना इतना गुमान कर "...!
आपण बाजारातून एखादी वस्तू विकत घेताना 10 वेळा विचार करतो. तिचा दर्जा ,तिचा टिकाऊपणा त्याचे सौन्दर्य आपण पाहतो. आणि जर आपल्या घरात सात जन्माची साथीदार - सहचारिणी आणायची असेल तर आपण "चिकीत्सक" व्हायलाच पाहिजे. परंतु एका चित्रपटात राजेश खन्ना ने एक " गोरे रंग पे ना इतना गुमान कर ..गोरा रंग एक दिन में ढल जायेगा ...! हे गाणे म्हंटले होते . तात्पर्य मुलगी सावळी असली तरी तिचा स्वभाव कसा आहे ती पतीशी ,नातेवाईकांशी कशी वागेल, म्हातारपणी मुलाला "साथ" देईल का ?? सासू - सासऱ्यांची सेवा करेल का ?? मुलांचे संगोपन करेल का ?? सावळी असली म्हणून काय झाले ,तिचे "शिक्षण" चांगले झाल्याने तिच्या होणाऱ्या "मुलांना " उत्कृष्ठ शिक्षण ती देऊ शकेल याचा सारासार विचार ही तरुणाच्या पालकांनी आवर्जून करावा. तरुणांनी सावळ्या आणि काळ्या मुलींना रिजेक्ट करण्याऐवजी आपला "कलर" आणि आपले "अवगुण" याचाही हिशेब लावणे गरजेचे आहे . काळ्या - सावळ्या मुली -तरुणी देखील तुम्हाला अनंत सुख - समाधान - प्रेम देतील याची मला निश्चित खात्री आहे. त्यामुळे तरुणाईने त्यांचा स्वीकार करावा.."आत्मचिंतन" करावे ..ही विनंती
( विषयाचे "गांभीर्य" पाहता सदर लेख मी रात्री 2.45 वाजता लिहीत आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी .)
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली .
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा