Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ जून, २०२४

*अकलूज पोलीस ठाणे यांच्यावतीने पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना*


 

*विशेष---- प्रतिनिधी*

  *राजु ------मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

*अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दि. १६/३/२०२४ रोजी पासून ते दि. ६/६/२०२४ पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून सोलापूरसह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल दि. ४/६/२०२४ रोजी जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लीकेशन माध्यमांद्वारे कोणत्याही समाजाच्या, जाती-धर्माच्या, धार्मिक भावना दुखावतील, अशा स्वरूपाच्या पोस्ट्स, कमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नये.

तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये. डीजे वाजणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत, तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. त्याचबरोबर व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दि. ३/६/२०२४ ते दि. ५/६/२०२४ या कालावधीत त्यांच्या ग्रुप सेटिंगमध्ये ओन्ली ॲडमिन करून बदल करून घ्यावा. जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही. जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

पोलीस निरीक्षक 

अकलूज पोलीस ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा