*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;- 9730 867 448
ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनियर कॉलेज कळंब, ता. इंदापूर. जी. पुणे,आयोजित आज शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस आज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र कदम उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्याध्यापक सर्वगोड व उपस्थित सर्व शिक्षक यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष फुले पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करुन प्रवेशोत्सव करण्यात आले व, इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्यात आली, सर्व विद्यार्थ्यांनी हसत खेळत व आनंददायी शिक्षण घेतले पाहिजे शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवला पाहिजे तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे मत विद्यालयाचे अध्यक्ष रामचंद्र कदम यांनी व्यक्त केले, शिक्षण बरोबर खेळाकडे देखील लक्ष दिले पाहिजे आपले जीवन नेहमी आनंदी ठेवले पाहिजे, नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी दररोज आणि वेळेत उपस्थित राहिले पाहिजे असे मत विद्यालयाचे प्राचार्य सर्वगोड यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख काशीद सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा