*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज : --रोटरी क्लब अकलूज च्या 2025-26 रोटरी वर्षाकरिता अध्यक्ष पदी केतन बोरावके तर सचिव पदी अजिंक्य जाधव आणि नूतन संचालक मंडळ यांचा पदग्रहण सोहळा कृष्णप्रिया मल्टी फंक्शन हॉल, संग्राम नगर अकलूज येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. राष्ट्रगीताने आणि तुळशीच्या रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मावळत्या अध्यक्षा रो.सौ. प्रिया नागणे व सचिव मनीष गायकवाड सर यांनी आपली जबाबदारी नूतन अध्यक्ष रो. केतन बोरावके व सचिव अजिंक्य जाधव यांचे कडे चार्टर, डाँग बेल व कॉलर प्रदान करून
प्रमुख अतिथी माजी प्रांतपाल मोहन पालेशा, 2026-27 चे प्रांतपाल जयेश पटेल, सहाय्यक प्रांतपाल रो. कैलास करांडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते सोपविली. तर मंचावरील मान्यवरांनी नूतन संचालक मंडळ यांना रोटरी पिन प्रदान करत शुभेच्छा दिल्या.
या पदग्रहण सोहळ्यास सहाय्यक प्रांतपाल रो.डॉ. कैलास करांडे, माजी प्रांतपाल रो.विशाल बेले, तसेच सांगोला, टेंभुर्णी, पंढरपूर, मोडनिंब, सातारा, पाचगणी व सराटी डिलाईट येथील रोटरी चे पदाधिकारी, सदस्य तसेच रोटरी क्लब अकलूजचे सर्व आजी-माजी सदस्य, पत्रकार बंधू, तसेच डॉक्टर्स, इंजिनियर्स, समाजसेवक, व्यावसायिक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रो.डॉ.कैलास करांडे यांनी जिल्हा प्रांतपाल रो.डॉ.सुधीर लातूरे यांचा संदेश उपस्थितांसमोर वाचून दाखविला. रो.सीए.नितीन कुदळे यांनी प्रमुख अतिथी रो. मोहन पालेशा यांच्या कार्यप्रवासाची माहिती दिली, तर रो. प्रवीण कारंडे यांनी रो.जयेश पटेल यांच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला.
प्रमुख अतिथी रो. मोहन पालेशा यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना सद्यस्थितीतील समाजातील बदलत चाललेली संवेदनशीलता यावर प्रकाश टाकत कौटुंबिक सदस्यांमधील व मैत्री मधील दुरावा व हरवत चाललेले घरपण या विषयावर व्यक्त होत सध्या वृद्धाश्रम मोठ्या प्रमाणात वाढत असून ते देखील अपुरे पडत आहे, ही स्थिती भीषण असून आजी आजोबा, आई वडील यांचं खरं जगणं व त्यांचा जगण्यामागील खरा आनंद वृद्धाश्रमामध्ये नसून त्यांच्याच वास्तू मधील त्यांच्या छत्रछायेखाली आपलं व आपल्या मुलांचं वावरणं यामध्ये आहे असे सांगत सामाजिक बांधिलकी जपताना प्रत्येक मनुष्यानं किमान आभाळभर न देता ओंजळभर तरी धन देत अथवा श्रम असा धनानंद आणि श्रमानंद घेतला तरच आपलं जगणं हे सार्थ ठरेल असे विविध दाखले, बोधपर गोष्टी आणि कवितांच्या माध्यमातून त्यांनी प्रभावीपणे सांगत सभागृहातील वातावरण मंत्रमुग्ध करत अनेक जणांच्या डोळ्यातील अश्रू रुपी भावनांना वाट मोकळी करून दिली.
याप्रसंगी विशेष अतिथी रो. जयेश पटेल यांनी रोटरीच्या माध्यमातून जगभरात पर्यावरण, शांतता, जल व्यवस्थापन, वैद्यकीय, शैक्षणिक, युवा व्यवस्थापन, महिला मुली सक्षमीकरण आदी क्षेत्रामध्ये रोटरी सदस्य हे दातृत्वाच्या आधारे रोटरीने केलेली व करत असलेली अनेक कार्य सांगत रोटरी सदस्य समाजातील अनेकांच्या सहकार्याने आनंद आणि समाधान कसा मिळवतात हे सांगितले. सर्वांनी नूतन अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळास पुढील यशस्वी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा वाघोली या शाळेस शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक संच भेट देण्यात आला. तसेच मंचावरील मान्यवरांच्या हस्ते रोटरी अकलूजच्या चक्र या वार्तापत्रा चे प्रकाशन करण्यात आले. तसेच विशेष सहकार्यासाठी रो.डॉ.श्रीकांत देवडीकर, नवीनचंद फडे, सासवड माळी शुगरचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप जाधव, मनशक्ती सेवा केंद्र अकलूज संस्थेतील साधक यांचा तसेच रोटरी सदस्यांच्या मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल दिपाली शेंडगे, श्रुती फडे, अर्णव गांधी, मल्हार कुदळे यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. रोटरी अवेन्यू ऑफ सर्विस हा रोटरी इंटरनॅशनल चा अवॉर्ड मिळाल्याबद्दल रो.सीए. नितीन कुदळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तर यावेळी उपस्थितांना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच उत्पन्नाच्या विचार स्रोतातून पर्यावरण पूरक पौष्टिक फळ देणाऱ्या मोरिंगा जातीच्या शेवगा शेंगा बियांचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी मावळत्या अध्यक्षा रो. प्रिया नागणे यांनी उपस्थित आमचे स्वागत करत आपल्या मनोगतातून वर्षभरात सेवाभावी उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळते सचिव रो. मनिष गायकवाड यांनी करत गतवर्षीच्या कार्याचा संक्षिप्त आढावा सादर केला, तर
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी नूतन अध्यक्ष रो. केतन बोरावके यांनी सर्व संचालक मंडळाचे स्वागत करत सर्वांच्या सहकार्यातून येत्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची व ध्येयधोरणांची रूपरेषा व संकल्पनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.ॲड. प्रवीण कारंडे आणि गजानन जवंजाळ यांनी केले तर नूतन सचिव रो. अजिंक्य जाधव यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा