Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

*निमसाखर येथील एन इ एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव उत्साहात*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो;- 9730 867 448

निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे, एन.ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आज शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंददायी व उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. त्यावेळी इयत्ता पाचवी आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांना वह्या, पुस्तके देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. त्यावेळी निमसाखर पंचक्रोशीतील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून दिली. शालेय वातावरण अतिशय प्रसन्न व आल्हाददायक झाले. त्यावेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक प्रमोद चव्हाण सर, सोमनाथ चौधर सर, हनुमंत तोडकर सर, आशा पर्वते मॅडम, यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. 





सर्व विद्यार्थ्यांनी हसत खेळत व आनंददायी शिक्षण घेतले पाहिजे, शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवला पाहिजे, तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे मत विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात सर यांनी व्यक्त केले. शिक्षणाबरोबर खेळाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपले जीवन नेहमी आनंद असले पाहिजे. कधीही नकारात्मक भूमिका ठेवली नाही पाहिजे, नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी दररोज आणि वेळेत उपस्थित राहिले पाहिजे असे मत विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्कृत विभागाने केले सूत्रसंचालन अजिनाथ मलगुंडे सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा