Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ जून, २०२४

*"अजित पवारांनी "--तू निवडून कसा येतो तेच बघतो-- अशी धमकी दिलेल्या आमदारांचे काय झाले ते पहा?*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी हाती आलेले आहेत. देशभरात भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. परंतु मतदारांनी त्याला खोड घातली असून एनडीएचे २९१ उमेदवार निवडून आले तर इंडिया आघाडीचे २३४ उमेदवार विजयी झाले आहेत. ८ अपक्षांनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत तर एनडीएने १७ जागांवर यश मिळवलं आहे. ज्या अजित पवारांनी काकांना सोडचिठ्ठी देत भाजपसोबत घरोबा केला त्या अजित पवारांना मतदारांनी साथ दिली नाही. अजित पवारांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला आहे. तर शरद पवारांच्या १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार विजयी झाले आहेत.

निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये अजित पवारांनी ज्या तावातावाने भाषणं केली, त्या तुलनेत त्यांना यश मिळालं नाही. विशेष म्हणजे ज्यांना-ज्यांना त्यांनी इशारे दिले किंवा धमक्या दिल्या ते तिनही उमेदवार विजयी झाले आहेत. शिरुरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके आणि बीडमधून बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अहमदनगरमध्ये सुजय विखे यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना अजित पवरांनी निलेश लंकेंना उद्देशून ''तू खासदार कसा होतो, तेच बघतो.. तुझा कंXच जिरवतो'', असं म्हणत इशारा दिला होता.

शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात बोलताना, ''तुझा बंदोबस्तच करतो, कसा निवडून येतो तेच बघतो'' असं विधान केलं होतं.

बीडमध्ये बोलताना बजरंग सोनवणेंना इशारा दिला होता. ''दोन पैसे आले की मस्ती आली का? आता बघूनच घेतो'' अशी धमकी दिली होती. महाविकास आघाडीचे हे तिनही उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे परक्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी असा दम भरला होता.

❓ तीन मतदारसंघामध्ये कुणाला किती मतं मिळाली?

अहमदनगर

निलेश लंके- ६,२४,७९७

सुजय विखे- ५,९५,८६८

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- २८,९२९

शिरुर

अमोल कोल्हे- ६,९८,६९२

आढळराव पाटील- ५,५७,७४१

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,४०,९५१

बीड

बजरंग सोनवणे- ६,८१,५६९

पंकजा मुंडे- ६,७४,९८४

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- ६,५८५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा