*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने रामायण चौकातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्री शनी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी मल्लिकार्जुन महादेवास अभिषेक नंतर नवग्रहाचे पूजन व अभिषेक करण्यात आले त्यानंतर वीरशैव महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला
सकाळी ११ वाजता श्री व सौ अनिता अशोक शेटे या उभायतांचे हस्ते शनि महाराजांची पूजा अभिषेक करण्यात आला दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होऊन महाआरती करण्यात आली.
दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.यावेळी समाजाचे उपाध्यक्ष संतोष देव शेटे,सचिव नागेश लिगाडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य उत्कर्ष शेटे, शिवाजी बागल,विठ्ठल बागल, चंद्रशेखर शेटे,महालिंग राऊत, भारत देशमाने,चंद्रकांत शेटे, सामाजिक कार्यकर्ते महादेव दळवी,वसंत दळवी,सचिन कथले,नागेश सोनगडे,संतोष कोल्हे,जनसेवा संघटनेचे पिंटू वैद्य,विजय टोंगळे,संदीप कुंभार, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष अमित कुंभार,बापू वैद्य,संतोष देवशेटे,सोमनाथ बिराजदार, महादेव विभुते,रामभाऊ विभुते, बाळू शेंडे,बापू वैद्य यांच्यासह लिंगायत समाज बांधव व शनी भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.महादेव मंदिराचे स्वामी निसर्ग स्वामी यांनी विधिवत पूजन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा