Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ जून, २०२४

*"वसंतदादाचे "घराणे संपवणाऱ्या प्रवृत्तीची हार सांगलीचे झुंजार विशाल पाटील खासदार* *बाप तो बापच होता है!*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला--सांगली,(पञकार)

वसंतदादा "बंडूजी" पाटील या नावातचं "बंड*"  

 वाचकहो, ज्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावातचं "बंड "असेल, ज्यांच्या पूर्वजांच्या रक्तात झुंज आणि त्वेष असेल ,त्यांच्या वारसांना "बंड" करून "विजयश्री " कशी मिळवायची हे सांगण्याची "गरज" नाही. 

आज त्याच वसंतदादा यांच्या नातवाने, सांगलीकरांच्या आशीर्वादाने "हीन" पातळीवरील विरोधाला, कटकारस्थान करणाऱ्या धूर्त - "कपटी" प्रवृत्तीला "मतदानाद्वारे" चोख प्रत्युत्तर देत दादा घराणे नेस्तनाबूतकरणाऱ्यांच्या "षड्यंत्राला" "सुरुंग"' लावला आहे. 

झुंजार विशाल पाटील खासदार!

 वसंतदादा घराण्याच्या नादाला लागालं तर एकावर एक फ्री (हातकणंगले ) मिळेल हे सांगली जिल्ह्याच्या स्वाभिमानी आणि जागरूक जनतेने इस्लामपूर च्या चाणक्याला दाखवून दिले. सत्ताधारी असलेल्या आणि गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या प्रवृत्तीने विशाल पाटील - पूजा विशाल पाटील व कुटुंबियांना लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचंड त्रास दिला. सर्वप्रथम "पक्ष" व "चिन्ह" गायब केले. पोस्टरवर वसंतदादा यांचा फोटो लावण्यास मनाई केली. विशाल पाटील यांचा "फेक" व्हिडिओ तयार केला,अनेक प्रकारे त्यांना "बदनाम" करण्याचे पाप केले. 



माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील व ,वडील खासदार स्व .प्रकाशबापू पाटील यांचा परंपरागत असणारा काँगेस हा पक्षच हिसकावला .आणि " हात" हे चिन्ह नसताना, जनतेच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत लिफाफा - या नवख्या चिन्हावर विशाल यांनी निकराने लढाई केली व जिंकली देखील.

   सांगलीचा वाघ एकच ..विश्वजीत कदम !

एक म्हण आहे . इर्षेने गाढवं कापून खाणे . वास्तविक एखाद्याला मुळासकट संपवून ,राजकीय कारकिर्दीचा अस्त करण्याची "खुमखुमी" पूर्ण करण्यासाठी काही लोक कोणत्याही "थरावर" जातं असतात. समोरचा प्रतिस्पर्धी पांढरे निशाण दाखवत असला तरी "युद्ध": करण्याची खुमखुमी जातं नसते. प्रतिष्ठा -सन्मान मिळत असताना देखील "जहरी डावपेच "करूनही युद्धात सहज "पराभव" होणे यालाच गाढवं कापून खाणे असे याला म्हणतात .(पूर्वीच्या काळात असे होत असे ) असो ,या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षश्रेष्टींकडून विशाल यांचे तिकीट आणण्यासाठी विश्वजीत कदम यांनी अहोरात प्रयत्न केले. घरातील "सदस्याप्रमाणे" शेवटपर्यंत तिकीट मिळण्यासाठीते ते जिद्दीने पेटले होते. परंतु विशाल यांना तिकीट न देण्यासाठी पडद्याआडून एक "बलाढ्य शक्ती" कार्यरत होती. शेवटी तिकीट न मिळाल्याने विश्वजीत यांना निराशा हाती आली. परंतु वसंदादांच्या घराण्याला संपवणाऱ्यांचे डावपेच आणि अपक्ष लढा देऊन, निवडून येईपर्यंत लावली गेलेली फिल्डिंग विश्वजीत कदम यांचे महत्व "अधोरेखित" करते . 

*बाप तो बाप होता हे* ..हे वाक्य खऱ्या अर्थाने "अर्थपूर्ण" बनवून गेले.

स्वार्थी राजकारण्यांना "धडा" शिकवणारा , सांगलीचे "आशास्थान" असणारा ,स्व. पतंगराव कदम यांचा सुपुत्र विश्वजीत कदम हा माई का लाल* खरंच सांगलीचा वाघ आहे याचा "सार्थ अभिमान" वाटतो!


जनतेने लढली विशालसाठी निवडणूक !


2024 ची लोकसभेची निवडणूक ही "जनतेने" लढली. अन्याय आणि अपेक्षाभंग* ही दोनच कारणे "अग्रस्थाने" होती .संपूर्ण सांगलीकर "मतमोजणी" दिवशी गुलालाने न्हाऊन निघाले होते . कारण हा एकप्रकारे समस्त सांगलीकरांचाच हा विजय होता . 

जयश्रीवाहिनी पाटील ,पृथ्वीराज पाटील ,शैलजाभाभी पाटील , रोहित आर .आर .पाटील , मिरज पॅटर्न , विलासराव जगताप ,अजितराव घोरपडे, सर्व आजी - माजी नगरसेवक - ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक ज्ञात - अज्ञात कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी विशाल पाटील यांच्यासाठी केलेलं कामं हे सार्थकी झाले आणि विशाल हे "खासदार" झाले. नूतन खासदार विशाल पाटील यांचे हार्दिक अभिनंदन - शुभेच्छा !


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज , सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा