*उपसंपादक---नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त माळीनगर येथे माजी आमदार रामहरी रुपनवर व दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे व आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समारंभ समिती माळीनगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर,आरपीआय तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,आरपीआय राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास बारामतीचे सनी विश्वासराव देवकाते,पं स.माजी उपसभापती किशोर सुळ,काँग्रेस कमिटी सचिव शिरीष फडे,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक पृथ्वीराज भोंगळे,म.फुले पतसंस्थेचे संचालक अंकुश फुले,माजी जि.प.सदस्य बाळासाहेब धाईंजे,काँग्रेस कमिटीचे जिल्हाउपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अजित बोरकर,आरपीआय युवक आघाडीचे राज्यउपाध्यक्ष किरण धाईंजे,पै.भारत सांगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल लोंढे,माजी उपसरपंच बाळासाहेब वजाळे,ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण डोईफोडे,मच्छिंद्र हजारे,अभिजित वजाळे,रिंकू राऊत,संजय दळवी,गजेंद्र म्हसवडे,विठ्ठल जाधव,दिलीप होनमाने,लक्ष्मीकांत वाघे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माळीनगरचे पत्रकार मिलिंद गिरमे,रितेश पांढरे,गणेश करडे,गोपाळ लावंड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन सकल धनगर मल्हार सेना जिल्हाध्यक्ष सोमनाथ हुलगे, नागेश हुलगे,नाना बंडगर,सुनील सुळ,अविनाश लकडे,आकाश होनमाने,संतोष होनमाने,संदीप लवटे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण घाडगे व भूषण घाडगे यांनी केले तर सोमनाथ हुलगे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा