*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अधिक उमेदवारांना यश मिळाल्याचे दिसले. तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा निवडणुकांमधील हातकणंगलेची जागा देखील चर्चेत होती. येथून शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने विजयी झाले आहेत.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाला आहे. यानंतर राजू शेट्टींनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
पराभवानंतर राजू शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये त्यांनी माझं काय चुकल! प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का?
असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांनो तुम्हीही…
असं म्हणतं पोस्ट शेअर केली आहे.
या मतदार संघातील सर्वसामान्य शेतकरी गरीब कष्टकरी वर्ग माझ्या पाठीशी असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते. मात्र धैर्यशील माने १३४२६ मतांनी विजयी झाले आणि सत्यजीत पाटलांसह राजू शेट्टी यांनाही पराभावाचा धक्का सहन करावा लागला.
*हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत*
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती.
धैर्यशील माने, सत्यजीत पाटील आण राजू शेट्टी असा सामना होता.
यामध्ये धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. अत्यंत अटीतटीची ही लढत झाली.
यामध्ये धैर्यशील माने हे फक्त १३४२६ मतांनी विजयी झाले आहेत.
माने यांना एकूण ५,२०,१९० मते मिळाली तर सत्यजीत पाटील यांना एकूण ५,०६,७६४ मते मिळाली.
तर राजू शेट्टींना एकूण १,७९,८५० मते मिळाली.
या निवडणुकीत राजू शेट्टींचा तब्बल ३,४०,००० मतांनी पराभव झाला आहे. यानंतर आता राजू शेट्टी यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा