Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १८ जून, २०२४

*शेतकऱ्यांनी बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खते इत्यादी बाबत ठोस पुराव्यासह तक्रार करण्याचे ----जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ,सोलापूर यांचे आवाहन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

अनेक वेळा बी बियाणे कीटकनाशक खत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते की चढ्या दराने विक्री करणे ,खरेदी पावती न देणे मुदत बाह्य बी बियाणे विक्री करणे व इतर वस्तू विक्री करणे अशा तक्रारी अनेक वेळा पाहावयास मिळतात त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की तुमच्या काही तक्रारी असतील त्या ठोस पुराव्यासह खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर करण्याचे आवाहन केले आहे



सोलापूर जिल्हयातील शेतक-यांना आवाहन करणेत येते कि बियाणे, रासायानिक खते, किटकनाशके इत्यादी कृषि निविष्ठा खरेदी करतेवेळेस ज्यादा दराने विक्री करणे, खरेदीची पावती न देणे, एका निविष्ठेसोबत दूसरी निविष्ठा खरेदीसाठी सक्ती करणे, (लिकिंग) निविष्ठा उपलब्ध असतानाही विक्री न करणे, मुदतबाहय निविष्ठा विक्री करणे इत्यादी स्वरुपाच्या तक्रारी संबधाने कृषि विभागास कळविणेसाठी जिल्हास्तरावर ७२१९२८६९२८ या व्हॉटस्अॅप नंबर सुरु करण्यात येत असून शेतकऱ्यांना उपरोक्त नमुद प्रकारच्या त्या संबंधीत विषयाच्या अनुषंगाने अडचणी आल्यास त्यांनी वर नमुद व्हॉटस्अॅप नंबर वरती आपल्याकडील ठोस पुराव्यासह तक्रार करावी. त्यावर शहानिशा करुन आवश्यक ती कारवाई करणेत येईल.


जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,

सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा