*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर गेली दोन दिवस मराठा आरक्षणाचे केंद्र बनून पाठबळ देणा-या आंतरवाली सराटी संघर्षयोध्दा मनोजजी जरांगे पाटील यांचे आंदोलनास पाठींबा देण्यास रीघ लागली..... ऐन लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी बारामतीचे युवराज (ज्यांच्या बापाने आम्हांस आरक्षणाची गरज नाही तसेच मुंबईला आंदोलनास येणा-या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करा अशी भुमिका घेतली) दाखल झाले....तसेच धाराशीवच्या पाटलांनी तर फडणवीसांवर जरांगे पाटील टीका केल्यावर आमच्या नेत्यांवर बोलल्यास असे करु तसे करु अशा वल्गना केल्या परंतु जनमत जरांगे पाटील यांचे पाठीशी उभे आहे हे पाहून भला मोठा सत्कार केला.....हे चेहरे नेमके कोण आहेत..... आत्ताच पाठींबा देण्याची गडबड का सुरू झाली......याचा मागोवा घेऊ.....
१.गेली ४० वर्षे मराठा आरक्षणाच्या लढ्यात असंख्य नेते_कार्यकर्ते समाजात तयार झाले_गमावले यातील एका तरी कुटुंबातील सदस्यांस धीर देण्याची भुमिका यांनी घेतली का ?
२.आरक्षण आंदोलनकर्त्यांवर आजवर मोर्चे_रास्ता रोको_बस पेटविणे_अगदी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टर फोडणे_परवाचे बीड/माजलगाव असे गुन्हे दाखल आहेत या नेत्यांपैकी किती जणांनी गुन्हे खरे खोटे तपासून रद्द करावेत याकरिता विधानभवनात प्रश्न उपस्थित केले किंवा टोकाची भुमिका घेतली....? (माहितीस्तव_परवा आचारसंहिता असताना देखील सोलापुरातील अशाच स्वरूपातील गुन्हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी एका आमदाराच्या फोनवर मागे घेतले)
३.कोपर्डी घटनेनंतर किती लोकप्रतिनिधींकडून संबंधित पिडीतेला किंवा कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात आवाज उठविला.....?
४.आंतरवाली सराटी येथे शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर पोलीस फोर्स घुसवून लाठीचार्ज_गोळीबार झाल्यानंतर किती पाठींबा देणा-या आमदारांनी सभागृहात आवाज उठवून हरामी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागीतला किंवा समाजातील भगिनी_अबाल वृध्दावरील लाठीचार्ज_गोळीबार हल्ल्याच्या निषेधार्थ स्वतःचा राजीनामा दिला ...??
५.राज्यभर मनोजजी जरांगे पाटील यांचे आंदोलन मोर्चे मेळावे सुरु असताना यापैकी किती लोकप्रतिनिधींकडून सहभाग दिसला (अपवाद आहेत) ....अगदी SIT चौकशी नेमली तेव्हा बाके वाजवून नागपूरी अजेंड्यास पाठींबा देणा-यांना आजच का पळापळ करावी असे का वाटले ?
६.अजित पवारांनी दोन वेळा सारथी बंद करण्याचा प्रयत्न केला.....अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रकरणे स्थगित केली....EWS मधुन तसेच ESBC मधुन निवड झालेल्या बांधवांना नियुक्त्या दिल्या गेल्या नव्हत्या.... त्यावेळी हे सगळे कुठे होते ?
७.महाराष्ट्रात मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या शेकडो शहीद कुटुंबीयांपैकी किती कुटुंबाची पाठिंब्यासाठी धावपळ करणा-या लोकप्रतिनिधींनी भेट घेऊन त्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात आवाज उठविला....मग आताच हे पुतना मावशीचे प्रेम कशासाठी ?
८.एरव्ही पक्षाची भुमिका किंवा नेत्याचा आदेश आल्याशिवाय कोणत्याही आंदोलनात न दिसणारे आमदार_खासदार आज नेत्यांच्या अगोदरच आंतरवाली सराटीत दाखल होतायत हे कशाचे द्योतक आहे.....खुर्च्या वाचविण्यासाठी चाललेला पाठींबा हा पोरखेळ करण्याचा प्रयत्न नव्हे तर काय ?
९.समाजाच्या जीवावर_पाठींब्यावर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणा-या प्रस्थापित नेत्यांकडून नेहमीच सत्ता ही स्वविकासासाठी राबविली गेली त्यातुन तयार झाले ते एकप्रकारे संस्थान_सहकार_कारखानदार त्यासाठी संरक्षण अन् त्यातुन पक्षभुमिकेशी बांधीलकी यात दुरान्वये समाज कुठेही दिसत नव्हता अन् नाही.
१०.स्मृतिशेष अण्णासाहेब पाटील,स्मृतिशेष अण्णासाहेब जावळे पाटील,स्मृतिशेष विनायक मेटे,मराठा सेवा संघ संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर व त्यांचे सहकारी,युवराज संभाजीराजे ई.उभा केलेला लढा आज मनोजजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वात पुढे जात असताना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हे प्रस्थापित संस्थान एकप्रकारे खालसा झाली अन् आज प्रस्थापित नेत्यांकडून आंतरवाली सराटी येथे पाठिंब्यासाठी रीघ लागली .....स्वागत आहे....परंतू खरा पाठींबा तेव्हाच दिसेल जेव्हा आंतरवाली_कोपर्डी सारख्या घटनेनंतर रस्त्यावर समाजासोबत दिसाल.
*वेळ अजूनही गेली नाही समाज म्हणून आलात तर स्वागतच निवडणुकीतील वाताहात पाहून सोंग केली तर फार काळ टिकत नाहीत तूर्त एवढेच*
*शिवश्री सचिन जगताप*
जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
सोलापूर-पंढरपूर विभाग
९६९६९६९५५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा