*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना व विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर कामगार कल्याण केंद्र, शंकरनगर येथे घेण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार,रामचंद्र सिद, गोविंद पवार,सुभाष कटके,तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्र सावंत-पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरूण तोडकर,माजी संचालक सुभाष पताळे तसेच शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण,विनायक केचे, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच इंडियन मेडिकल असोशिएशन, अकलूजचे डॉ.संतोष खडतरे, ब्लड बँकेचे डॉ.अजित गांधी व त्यांचा स्टाफ त्याचबरोबर कारखान्याचे अधिकारी,युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरामध्ये कारखाना व विविध संस्थांचे कर्मचारी,शंकरनगर परिसरातील युवक,महिला,नागरीक यांनी रक्तदान शिबीरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केल्याने मानवी जीव वाचविण्यास मदत होते, अशा सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी सहभागी रक्तदात्यांचे आभार मानले.
हे रक्तदान शिबीर पार पाडण्यामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना,विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी व कामगार युनियन यांनी सहकार्य केलेची माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा