*श्रीपूर--बी.टी.शिवशरण.
जांबूड पंधरा सेक्शन येथील सुभाष मनोहर सरवदे हे नुकतेच सांगोला एसटी आगारातून वाहन निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी एसटी मध्ये बत्तीस वर्षे सेवा केली आहे ते सुरुवातीला वाहन चालक म्हणून काही एसटी आगारात कर्तव्य बजावले आहे अतिशय शांत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या सुभाष सरवदे यांनी अनेक सहकारी मित्र अधिकारी यांचा विश्वास संपादन केला आहे सांगोला एसटी आगारातून त्यांचे बरोबर नऊ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचे सेवावृत्ती निमित्ताने सांगोला आगारात सुभाष सरवदे व इतर आठ सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आगाराचे वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या सांगोला आगारात मंडप टाकून आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित स्नेही मित्र मंडळी यांना भोजन देण्यात आले सत्कार समारंभात सेवानिवृत्त कर्मचारी विद्यमान कर्मचारी काही अधिकारी यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता सोलापूर जिल्ह्यात सांगोला एसटी आगार तीन नंबरला आहे सांगोला एसटी आगारात अधिकारी कर्मचारी वहानचालक कंडक्टर यांचे ऋणानुबंध जुळलेले असल्याने एकमेकांना आनंदाने भेटत होते आपुलकी जिव्हाळा नातेसंबंध जपत होते आगार प्रमुख पोफळे यांचे हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आगारप्रमुख पोफळे यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे आयुष्य सुखासमाधानाने व निरोगी जावो या शुभेच्छा दिल्या प्रत्येकांनी आपला सेवा कार्यकाळ प्रामाणिक सेवा केल्याचे नमूद केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा