Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ जून, २०२४

*आगामी सांगली विधानसभेची उमेदवारी कोणाला,"जयश्री पाटील कि पृथ्वीराज पाटील??.*

 


*सांगली--इक्बाल बाबासाहेब मुल्ला--(पञकार)

जयश्री पाटील की पृथ्वीराज पाटील ??

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर" आगामी विधानसभा निवडणुकीत "अजिंक्य विजयाची " चाहूल आता काँग्रेस कार्यकर्त्यांना लागली आहे. विधानसभेला काँग्रेस चा उमेदवार कोण ?? 

5000 मतांनी "निसटता पराभव" मिळालेल्या "पृथ्वीराज पाटील" यांना काँग्रेस पक्ष "प्राधान्य" देणार की असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा असणाऱ्या "जयश्री पाटील" यांना "तिकीट" देणार ?? काँग्रेस चे बलाढ्य नेते - "चाणक्य" आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील कोणती "भूमिका" घेणार ??? यदाकदाचित तिकीट नाकारले तर बंडखोरी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे ,हे सांगलीकरांनी लक्षात ठेवावे ! बंड कोण करणार ??

"वसंतदादा पाटील "यांनी सर्व शक्तिमान असणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी "बंड" केले, मदनभाऊ पाटील "बंड" करूनच "अपक्ष" आमदार झाले, विशाल पाटील* यांनी काँग्रेस चे तिकीट नाकारले असताना जनतेच्या सहानुभूतीवर विजय खेचून आणला व "खासदार" झाले. त्यामुळे या घराण्याला "बंड" नवीन नाहीच. राहिला प्रश्न पृथ्वीराज पाटील यांच्या बंडाचा! जर पृथ्वीराज पाटील यांना "तिकीट" नाकारले गेले तर ??? पृथ्वीराज हे सहकार महर्षी स्व. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आहेत. गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कित्येक शाळा - कॉलेज ही त्यांचे बलस्थान आहेत . 



"बंड" यांच्या रक्तात नाही. अतिशय "संयमी" व धीरोदत्त ही त्यांची ओळख आहे . तथापि तथाकथित "बंड" झाले तर धक्कादायक राजकारण आणि धक्कातंत्र सांगलीची जनता अनुभवेल. कारण तेंव्हा चिन्हाची अदलाबदल पाहावयास मिळण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. सुधीर गाडगीळ यांनी भाजपाची उमेदवारी सन्मानाने "नाकारली" तर ....कदाचित ,भाजपचा उमेदवार हा देखील "बदललेला" असेल .....! 

 पृथ्वीराज पाटील यांच्यामुळे काँग्रेस पक्ष "जिवंत" ! 

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात "भाजपाचा वारू" रोखत काँग्रेस पक्षाच्या पंखांमध्ये प्राण- फुंकणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यास "तोड" नाही. त्यांच्या शेकडो आंदोलनांनी सांगली मध्ये काँग्रेस जिवंत असल्याचे सिद्ध झाले.

संपर्काचा अभाव व जनतेशी नसलेला संवाद हे पृथ्वीराज पाटील यांची "उणीव" दर्शवतो ! 

 गतवर्षी केवळ 5000 मतांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरुद्ध झालेला त्यांचा पराभव सांगलीच्या समस्त जनतेच्या जिव्हारी लागणारा आणि "आत्मचिंतन" करावयास लावणारा होता. खासदार विशाल पाटील यांच्या विजयात "अंडरग्राउंड " अतिशय चोख काम पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. विशाल पाटील यांच्या विजयात त्यांचा ही महत्वपूर्ण वाटा आहे. अतिशय विनम्र आणि प्रेमळ व्यक्तिमत्व हे त्यांचे खास वैशिष्टय !

 जयश्री पाटील यांच्याकडे "मदनभाऊ पाटील" हेचं बलस्थान !

सांगलीत मदनभाऊ पाटील यांच्या निधनांनंतरही - मदनभाऊ युवा मंच -आणि मदनभाऊ यांच्यावर प्रचंड "प्रेम" करणारा "मोठा गट" अजूनही जिवंत आणि अभेद्य आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची "श्रद्धा" जयश्री पाटील यांच्या "चरणी" ठेवली आहे. आज विशाल पाटील खासदार झाल्यामुळे हे सर्व मदनभाऊ प्रेमीं जयश्री पाटील यांना "आमदारपदी" पाहू इच्छितात. 

सांगली विधानसभा मतदारसंघावर मदनभाऊ नंतर जयश्री वहिनींचाचं "अग्रहक्क" असल्याचे मदनभाऊप्रेमी प्रामुख्याने सांगतात 

जयश्री पाटील यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक ,विष्णुअण्णा पाटील खरेदी विक्री संघ ,अशी सहकाराची बलस्थाने आहेत. जयश्रीवाहिनी पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील मदनभाऊ युवामंचच्या माध्यमातून हजारो मदनभाऊप्रेमी कार्यकर्त्याची फौंज अविरतपणे ठाण मांडून आहे. किमान 1000 पेक्षा जास्त कार्यकर्ते ही त्यांची "जमेची बाजू" आहे. महापालिकेतील काँग्रेसचे 10 - 15 नगरसेवक त्यांचा शब्द प्रमाण मानतात. मदनभाऊंच्या विश्वासू व कट्टर कार्यकर्त्याच्या बळावर " विजय" बंगल्यावर पुन्हा एकदा विजयी तिलक लावण्याचा "चंग" मदनभाऊ पाटील यांच्या समस्त कार्यकर्त्यांनी केलेला दिसतो आहे. तिकीट मिळो अथवा न मिळो, यशस्वी खिंड लढवत जयश्री वहिनींना आमदार करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. विशाल पाटील यांच्या विजयात "सिंहाचा वाटा" हा जयश्री पाटील व कार्यकर्त्यांचा होता .त्यामुळे तब्बल 20 हजारांचे मताधिक्य विशाल यांना मिळाले असे त्यांचे कार्यकर्ते खाजगीत सांगतात.  

रक्ताचे नातेसंबंध म्हणून आगामी विधानसभेला विशाल पाटील हे जयश्री पाटील यांचे नावं "पुढे" करू शकतात असा "तर्क" करण्यात येत आहे .

ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये विधानसभेचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. परंतु आत्तापासून "दोन्ही उमेदवारांची" घालमेल वाढलेली दिसत आहे .नागरिकांच्या गाठीभेटी सुरु आहेत , संपूर्ण जिल्ह्यात सांगलीचा उमेदवार कोण ?? हाच सध्या कळीचा "प्रश्न" बनला आहे . दोन्ही भावी उमेदवारांना आमच्या हार्दिक शुभेच्छा !


. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा