इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- परीसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गुलाब पुष्प व पेढा देऊन स्वागत करण्यात आले.
ओझरे (ता. इंदापूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गुलाब पुष्प व पेढा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालक नेताजी पवार यांचे मार्फत मुलांना पेढे वाटप करण्यात आले. तसेच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नवीन दाखल मुलांचे स्वागत करून करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व मुलांना पाठ्यपुस्तक, लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन उत्साहात घेण्यात आला.
सदरचा कार्यक्रम तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांचे प्रेरणा व मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील सर यांनी दिली. कार्यक्रमाला पालक, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
नरसिंहपूर परीसरातील पिंपरी बुद्रुक, टणू, गिरवी, गणेशवाडी, डिसलेवस्ती, लुमेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गुलाब पुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना खाऊ व मिठाई वाटप करण्यात आले.
सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी पहिल्या दिवशी उपस्थित राहत विद्यार्थ्यांचा सन्मान करून प्रवेश दिला.
फोटो - ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देवून गौरविण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा