Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

*माळशिरस तालुक्यात पेरणीयुक्त सरासरी पाऊस झाल्याने खरीप पेरणीची लगबग ...कृषी विभागाची मोहीम पोहोचली सर्वत्र--- सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी नातेपुते*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो;- 9730 867 448

खरीप हंगाम समाधानकारक पाऊस पेरणीची लगबग, कृषि विभाग प्रशिक्षणे व मोहीम सर्व गावात पोहचल्या ! माळशिरस तालुक्यातील १० महसुल मंडळात १५ जून अखेर खालील प्रमाणे पाऊस झाला . इस्लामपूर मंडळ मध्ये ६दिवसात ७९ . ६ मिली , माळशिरस मंडळ मध्ये ६ दिवसात १३२ ३ मिली, सदाशिवनगर मंडळ मध्ये ७ दिवसात १३७ . ३ मिलि, दहीगाव मंडळमध्ये ७ दिवसात २३० .७ मिली , नातेपुते मंडळमध्ये ७ दिवसात २०४.७ मिलि , अकलुज मंडळ मध्ये ६ दिवसात ९२ .६ मिलि, लवंग मंडळमध्ये ६ दिवसात १०१ . ७० मिली , महाळूंग मंडळ मध्ये ७ दिवसात ११८ .७० मिली, वेळापूर मंडळ मध्ये ६ दिवसात ११० .६ मिली व पिलिव मंडळमध्ये ७ दिवसात १८९ . मिली असा तालुक्यात ११६ गावात सरासरी ११३.१ मिली म्हणजे हंगाम सरासरी पर्जन्यमानाच्या १३९.९ % पाऊस झाला आहे . एकदरीत समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची ओली ७सेमी पर्यत काही अपवादात्मक गाव व क्षेत्र वगळता ओलीखाली गेली आहे व पाऊससरी चालू आहेत तरी खारेप बाजरी ' मका, भूईमुग, तूर, सुर्यफुल मुग, उडीद सोयाबीन , ऊस पेरणी करण्यास हरकत नाही . समाधानकारक पाऊस झाला मुळे मकेच्या तालुक्याच्या सरासरी १५ हजार हे व उसाच्या सरासरी ३० हजार व बाजरी सरासरी तीन पाचशे हे तालुक्यातील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे . डोगरी ३ २ गावात बाजरी , मुग , उडीद पिकाच्या लागवडीत वाढ होणार आहे . तालुका कृषि विभाग प्रशासनामार्फत तालुक्यातील ११६ गावात बीज प्रक्रिया , पेरणी पूर्व प्रशिक्षण , विविध मोहीमा , शेतीशाळा जवळपास सर्व गावात पूर्ण झाले आहे . गुणवत्ता पूर्वक बियाणे, किटकनाशके,खत विक्रेते केद्र तालुका अधिकारी,कृषि सहायक , कृषि पर्यवेक्षक ' मंडळ कृषि अधिकारी, कृषी अधिकारी पचायत समिती यांचे मार्फत तपासणी करण्यात आली आहे . 



 [ १ - शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेते, मान्यताप्राप्त कंपनी यांचेकडून आपले विभागास कृषि विद्यापीठ शिफारस वाणाचा जमिन प्रकार व खोली प्रमाणे खरेदी पावती सह खरेदी करावी . २ - एकात्मिक खत व्यवस्थापन मध्ये मातीपरिक्षणावर आधारित विद्यापीठ शिफारस सरळ खताचा वापर करावी म्हणजे खर्चात बचत होईल. ३ - बीज प्रक्रिया सह कांदा पिकाची रोपे लागवड करून , मका, बाजरी, सोयाबीन , तूर, उडीद मुग, सुर्यफुल बीयाणेस जैविक प्रक्रिया करून बीबीएफ व २ चांडे पाभरीने खत बियाणे पेरणी करावी . ४ - अतिवृष्टी ,पुर , गारपीट , पावसाचा खंड यावर संरक्षणासाठी पीक विमा उतरावा व फळबागासाठी हवामान आधारित पिक विमा उतरावा . सेवारत्न श्री सतिश कचरे मं डळ कृषि अधिकारी नातेपुते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा