Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ८ जून, २०२४

*महिलांचे सक्षमीकरण होणे काळाची गरज--- रणजित शेंडे*

 


*अकलूज ----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्र खुडूस अंतर्गत मौजे निकमवाडी खुडूस येथे नवीन स्वाभिमान ग्रामसंघ समुदाय निधी कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

           ग्रामसंघ अध्यक्षा निकम मॅडम व सोनाली ठवरे आकांक्षा लोक संचलित साधन केंद्रचे सचिव व व्यवस्थापक दत्तात्रय गोरे,क्षेत्र समन्वयक सुवर्णा लंगोटे मॅडम व समूह साधन व्यक्ती जयश्री पळसे मॅडम तसेच ग्रामसंघ लेखापाल रुपाली बोरकर मॅडम व बचत गटातील महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.



         यावेळी स्वाभिमान ग्राम संघ निकमवाडी येथील पाच बचत गटातील महिलांना समुदाय निधीतून तीन लाख रुपयाचे वाटप करण्यात आले.तसेच ५ जूनचे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बचत गटातील शंभर महिलांना केशर आंब्याची रोपे मोफत वाटप करण्यात आले तसेच निकमवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

           यावेळी मार्गदर्शन करताना रणजीत शेंडे म्हणाले की,बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे.महिलांनी मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून मोठे उद्योग व्हावे व स्वतःच्या पायावर उभे राहून चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह व्हावा.



           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन जयश्री पळसे यांनी केले तर आभार सुवर्णा लंगोटे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा