Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहादुर गट( बिजवडी) येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो;- 9730 867 448

१५ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट(बिजवडी) येथे नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव उत्साहात उत्साहात साजरा करण्यात आला.

     प्रथमतः ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व थोर गणितज्ञ आर्किमिडीज यांच्या प्रतिमेचे पूजन बिजवडी गावच्या उपसरपंच माननीय सौ. वर्षाताई मदने व शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ. आशा भजनावळे यांच्या हस्ते करण्यात आले.

     इयत्ता पहिलीतील दाखल पात्र विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात, गुलाब पुष्प ,फुगे तसेच स्वागत टोपी देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले.



      शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख त्याचबरोबर भविष्यकालीन कार्याचा आराखडा याबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर यांनी मार्गदर्शन केले.

     त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

    शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

    शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना आवश्यक लेखन साहित्य म्हणून वह्या पेन्सिल वाटप करण्यात आले.

     शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम विविध लाभांच्या योजना याबाबत अजमीर फकीर सरांनी माहिती दिली.

     विद्यार्थ्यांना गोड खाऊ पेढे , जिलेबी ,केळीचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहार अंतर्गत मसालेभात मेन्यू देण्यात आला.अशा प्रकारे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदाने पार पडला.



     सदरच्या कार्यक्रमासाठी बिजवडी गावचे उपसरपंच वर्षाताई मदने, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा आशा भजनावळे, दिपाली लोखंडे शाहीन नदाफ , शहनाज नदाफ . अश्विनी गरुड, आरती लोखंडे, मथुरा लोखंडे, अश्विनी साठे, अंगणवाडी सेविका गिरीजा गेजगे, सारिका चव्हाण तसेच शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक . श्रीकांत राऊत सर यांनी केले. अजमीर फकीर सरांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा