Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

*अकलुज येथील सदाशिवराव माने विद्यालय-प्राथमिक विभाग प्रशालेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो;- 9730 867 448

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा, अकलूज प्रशालेत आज नवीन प्रवेश घेतलेल्या व प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.


       प्रशालेत आज शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.



        यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.यावेळी पालकवर्ग व सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा