Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ जून, २०२४

नियमित योगासन केले तर शरीर निरोगी राहील ...सोल्जर विकस जगदाळे.

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

माळशिरस तालुक्यातील २५/४ लवंग येथील फीनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या शाळेतील विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी सध्या काश्मीरमध्ये देशसेवेसाठी कार्यरत असणारे सोल्जर विकास हनुमंत जगदाळे (तांबवे) यांनी योगासनांचे प्रत्यक्षिक करून दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



             यावेळी मार्गदर्शन करताना देशसेवक जगदाळे म्हणाले की,नियमित योगासन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. उत्तम आरोग्यासाठी नियमित योगासन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांना प्रणायाम,ताडासन,धनुरासन नियमित पणे केले पाहिजे मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. रस्त्यावरील तळलेले पदार्थ चिप्स,स्नॅक्स खाने टाळावे.फळे व पालेभाज्यांचे नियमित सेवन करावे व लहान वयापासूनच योगासन,धावणे,चालणे,पोहणे, या सवयी अंगिकारल्या पाहिजेत असे सांगितले.



                 या प्रसंगी शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख शिक्षिका गुलशन शेख,तमन्ना शेख उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा