*श्रीपूर--बी.टी.शिवशरण
श्रीपूर मिलिंद नगर येथील महेश महादेव खुंटे यांची भारतीय नौदल स्टोअर अधीक्षक म्हणून निवड झाली आहे महेश खुंटे यांचे शालेय शिक्षण श्री चंद्रशेखर विद्यालयात झाले आहे त्यांचे वडील लष्करात होते अत्यंत सुस्वभावी महेश याने पहिल्या पासून स्पर्धा परीक्षा अभ्यास सुरू केला आहे त्याची मनापासून जिद्द चिकाटी आहे की उच्च पदावर जाऊन समाजाची देशाची सेवा करण्याची त्याने स्टाफ सिलेकशन कमीशन परिक्षा दोन वर्षांपूर्वी दिली होती त्याचा काल निकाल आला आहे पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला आहे त्याने पोलिस उपनिरीक्षक पदाची ही परिक्षा दिली आहे तो निकाल यायचा आहे महेश खुंटे यांची भारतीय नौदल स्टोअर अधीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल श्रीपूर मध्ये त्यांचे मित्रपरिवार नातेवाईक सामाजिक संघटना तसेच आरपीआय श्रीपूर यांचे वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा