*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
पुणे - 21 जून :--मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांची लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्यामुळे ते काहीसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. यानंतर ते परत शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ आमच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र आता ते पुन्हा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. यावर स्वतः शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना त्यांना भुजबळांविषयी विचारणा करण्यात आली. तुमचे जुने सहकारी छगन भुजबळ यांना आता पश्चाताप होत असल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून परतीचे संकेत मिळत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात, ‘आम्हाला काही माहिती नाही’, असे उत्तर दिले.
छगन भुजबळ यांच्याशी संपर्क नाही. तसेच छगन भुजबळ यांची आणि माझी सहा महिन्यात भेट झालेली नाही. आमचा संपर्कही नाही आणि याबाबत कसले बोलणही नाही, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा