Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ जून, २०२४

*जीवनसाथी व हमसफर या महत्त्वाकांक्षी आशेपोटी दुर्दैवी फेऱ्यात "हतबल पालक आणि तरुणाई"*

 


*इक्बाल मुल्ला--सांगली

"पालकांच्या" संवेदना "पायदळी" तुडवत, तरुण - तरुणींच्या भावनांशी खेळत ,केवळ पैशाच्या मोहापायी "आयुष्याचे" खेळणे करणाऱ्या तथाकथित मॅरेज ब्युरोवाल्यांच्या "पापाचा घडा" फोडण्याची गरज निर्माण झाली आहे. -हमसफर- देणार असल्याची खोटी आवई उठवून "गरीब वा श्रीमंत" सर्वांनाच लुबाडणाऱ्या या "टोळ्यांविरुद्ध" पोलिसात तक्रार दाखल करायचे धाडस पालकांनी करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. हमसफर अर्थात जीवनसाथी च्या दुर्दैवी फेऱ्यात आज "हतबल पालक" आणि तरुणाई अडकली आहे . 

स्थळ जमवताय मग मोबाईल नंबर ची "खाडाखोड" का ??


उपवर मुला - मुलींचा बायोडाटा, स्वतःच्या मॅरेज ब्युरो (वधू -वर सूचक मंडळ) च्या नावाने तयार करून , खऱ्याखुऱ्या आई -वडिलांचा "मोबाईल "नंबर डिलीट करून, स्वतःच्या वधू -वर सूचक मंडळाचा मोबाईल नंबर घालून फसवणूक करणाऱ्या एजंटचा सुळसुळाट सांगली जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे.



परमेश्वराची भीती नाही ! 


सांगलीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीने अशा या मॅरेज ब्यूरो मध्ये हजारो रुपये भरूनही जाणीवपूर्वक "टाळाटाळ" करण्यात आल्याचे सांगितले . आपले विवाह जमेल या अपेक्षेने तरुण - तरुणी पैसे देतात. एकदा का पैसे मिळाले की पसंद असलेल्या स्थळाबद्दल टाईमपास केला जातो. व नंतर ते स्थळ रद्द करूया. त्यांचा विवाह जमला आहे,असे सांगून "फसवले" जाते . अशा समाजविघातक प्रवृत्तींचा पर्दाफाश झालाच पाहिजे. पालकांनी एकत्र येऊन पोलिसांशी सपंर्क साधून यासर्वांचे बिंग फोडले पाहिजे . या एजंटांना - मॅरेजब्यूरोवाल्याना परमेश्वराची अजिबात भीती नाही हे सर्वश्रुत आहे.

पॉश ऑफिस ,उच्च दर्जाचे व्हिजिटिंग कार्ड ! 



पैसे मिळवणाऱ्या या बाजारात , मॅरेज ब्युरो चे ऑफिस आणि ऑफिसमधील स्टाफ ही "सर्वोत्कृष्ठ" असतो . हा डामडोलं पाहून येणारे पालक "प्रभावित" होतात. आणि त्यांची "फसगत" होते. 

सांगलीसह महाराष्ट्रातील मोफत स्थळ जमवणाऱ्या "सन्माननीय" एजंट्सचा सुखद अपवाद वगळता परमेश्वराला राजी करण्याचे सोडून बरेचसे मॅरेज ब्युरो- एजंट्स मुला - मुलीच्या बायोडाटा ची ,मोबाईल नंबरशी छेडछाड करत त्यावर आपल्या फर्म चा नंबर टाईप करत आहेत .आणि पालकांना विनाकारण मानसिक त्रास देत आहेत .कारण संबंधित बायोडाटा वर कॉल केला तर त्या ऑफिसच्या मॅडम अथवा पुरुष कर्मचाऱ्याला ला फोन लागतो ..5000 रुपये आधी भरा ...मगच बायोडाटा मधील मुलीचा किंवा मुलाचा संपर्क नंबर देतो ...असे "निर्लज्जपणे "सांगितले जाते .

कितीही विनवणी केली,"हात जोडले" तरी ,आधी लग्न जमू द्या त्यानंतर पैसे देतो असे पालकांनी सांगितले तरी ते त्या बायोडाटा वरील "नंबर " देत नाहीत .पालकांची ही "छळवणूक" नाही का ??


विवाह जमवणे म्हणजे एक "हज" चे पुण्य


विवाह जमवणे हे एक "हज" करण्याचे पुण्य आहे असे प्रेषित मोहम्मद पैगम्बर सांगतात .परंतु असे असूनही आज लग्न जमवणे याचा बाजार मांडला असुन व्यवसाय केला गेला आहे . .परंतु काही तथाकथित एजंट त्याचा "धंदा" करू लागले आहेत

"मृताच्या टाळूवरील "लोणी" खाणारी अशी हीं प्रवृत्ती नष्ट करणे गरजेचे आहे . 

मध्यन्तरी कोल्हापूर जिल्ह्यात एका "सोयेल" नावाच्या एजंट ने गुगल पे च्या माध्यमातून पैसे घेतले . आणि स्थळ दाखवण्यासाठी तो "टाळाटाळ" करू लागला . त्यानंतर सांगलीतून मुलाकडील लोकांनी तेथे जाऊन त्या एजंटची धुलाई केली व "पैसे" वसूल केले. प्रत्येक वेळी "शेरास सव्वाशेर" मिळू शकत नाही. वास्तविक 

लग्न जमवण्यासारखे "पुण्य" कशाचेहीं नाही. .! . "पैशासाठी" कोणी गरजवंताचे श्राप घेत असतील तर, तो पैसा कधीच त्यांना "लाभणार" नाही,हेही तितकेच खरे ! 

विवाहाचे "स्वप्न " रंगवणाऱ्या मुलींच्या "स्वप्नांची" "राखरांगोळी करणाऱ्या या तथाकथित पैसेखाऊ मॅरेज ब्युरो आणि एजंट च्या नाकर्तेपणामुळे " आज "शेकडो मुली" महाराष्ट्रात - घरात खितपत बसल्या आहेत .त्यांच्या भावनांशी कोणी "खेळत" असेल तर त्याला वाचा फोडायला हवी की नाही ??? त्या सर्व मुलांना - तरुणींना "समाज" म्हणून आपण "न्याय" देऊ शकतो की नाही ??

आज विवाहयोग्य मुलींचा अश्रूंचा "महापूर" झाला आहे ...परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या या एजंटांना कशाची तमा व पर्वा नाही. एजंट्स ना पैसे हवे असतील तर थोडेसे, जे पालकांना परवडतील एवढेच घ्या .पालक गरीब व गरजवंत असतात .त्यांची परीक्षा घेतली जाऊ नये हीं विनंती. पालकांचे आशीर्वाद घ्या, आपणास आयुष्यात कधीच "कमी" पडणार नाही.



*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

 (*पत्रकार*)

 संपादक - सांगली वेध )

 संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा