Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ८ जून, २०२४

*सिंदफळ ता. तुळजापूर येथील नगर रचनाकार कार्यालय धाराशिव व शासनाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी--- अमोल शिवाजी जाधव*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

मोजे सिंदफळ, ता. तुळजापूर येथील सर्व्हे न. 187 पैकी क्षेत्र 07 हे 27 आर चे क्षेत्राबाबत श्रीमती. शशिकला दत्तात्रय दहिहांडे, रा. भवानी रोड, तुळजापूर यांनी रहिवाशी प्रयोजनासाठी सुधारित रेखांकन मंजूर करणे बाबत दिलेला अर्जाबाबत व सदरच्या रेखांकनास अंतिम मान्यता नसताना प्लॉट विक्री केले बाबत.

अमोल शिवाजी जाधव, रा. मंकावती गल्ली, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि.धाराशिव.

यांनी धाराशिव (उस्मानाबाद) येथील नगररचनाकार कार्यालय येथील रचनाकार अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे 




  याबाबत सविस्तर वृत्त असे कि , मौजे सिंदफळ, ता. तुळजापूर येथील सव्हें न. 187 पैको क्षेत्र 07 हे 27 आर चे क्षेत्राचावत सुधारित रेखांकन मंजूरी बावत आपल्या कार्यालयाने जा.क्र. मौजे सिंदफळ / ता. तुळजापूर / जि.धाराशिव / स.नं. 187 पे / रेखांकन / उस्मानाबाद /346 दि. 10/03/2016 रोजी तहसीलदार साहेब यांच्याकडे पत्राव्दारे कळविले होते. तसेच श्रीमती शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांनी वर नमूद विषयातील रेखांकनास अंतिम मान्यता नसताना देखील काही भूखंड विक्री केलेले आहे. जे की चुकीचे व बेकायदेशीर आहेत. तसेच शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांनी त्यांच्या रेखांकनातील भूखंड विक्री करणार नसल्याबाबत दि. 16/10/2015 रोजी शपथपत्र दाखल केलेले आहे. असे असताना देखील त्यांनी दि. 13/06/2016 रोजी दस्त क्रं. 2230/2016 अन्वये शुभम सुरेशराव झाडपिडे यांना भूखंड क्रं. 24 एकूण क्षेत्रफळ 165 चौ.मी. खुली जागा विक्री केलेली आहे, जे कि

शेतीमियांग झालेला आहे

 तसेच शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांना दि. 10/03/2016 रोजी नगर रचनाकार धाराशिव यांनी दिलेल्या पत्राच्या मुद्दा क्रं. 5 प्रमाणे रस्ते. गटारी व खुली जागा महसुल विभागाकडे रु. 1/- नाममात्र किंमतीत अंतिम मान्यता मिळाल्यानंतर हस्तांतरीत करण्याऐवजी दि. 13/12/2012 रोजी दस्त क्रं. 3865/2012 अन्वये ग्रामपंचायत सिंदफळ यांना हस्तांतरीत केले. सदर ले-आऊट हा (Layout Plan 70624 लिपीक Recon Anded for Demarcation) साठी असताना तो अंतिम मान्यता आहे असा दर्शवून काही प्लॉटची विक्री केलेली आहे जे की दिलेल्या मान्यतेनुसार नसून चुकीचे व बेकायदेशीर विक्री केलेली आहे प्रत्यक्षात शशिकला दत्तात्रय दहीहंडी यांनी अभिन्यासाची आखणी जागेवर पक्क्या दगडाच्या सहाय्याने करून त्याची फेरमोजणी करून संबंधित उपाधीक्षक भूमी अभिलेख खात्याकडून करून घेऊन तो नकाशा अंतिम मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक होते परंतु अंतिम मान्यता न घेताच त्यांनी मौजे सिंदफळ ता. तुळजापूर येथील सर्वे नंबर 187 मधील काही भूखंड बेकायदेशीर रित्या विक्री केलेले आहेत तसेच मौजे सिंदफळ ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाने देखील सदर प्रकरणात दाखल केलेल्या कागदपत्राची शहानिशा न करता ग्रामसभा घेऊन नगररचनाकार धाराशिव यांनी दिलेल्या पत्राच्या मुद्दा क्रमांक 6 प्रमाणे रस्ते, गटारी, व खुली जागा नसून विभागाकडे नंबर 1मात्र किमतीत अंतिम मान्यता मिळाल्यानंतर हस्तांतरित करण्याऐवजी 13/ 12 /2012 रोजी दस्त क्रमांक 3865/ 2012 अन्वये ग्रामपंचायत सिंदफळ यांनी बेकायदेशीररित्या हस्तांतरित करून घेतले

    सदर प्रकरणी शशिकला दत्तात्रय दहीहंडी यांनी नगर रचनाकार धाराशिव यांच्या दिलेल्या अटी व शर्तीचे तसेच शासनाने घातलेल्या शर्तीचे उल्लंघन केलेले असल्याने नगर रचनाकार अधिकारी यांनी सदर प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी असे अमोल शिवाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे


माहितीस्तव या तक्रारी अर्जाची प्रत


1) उपविभागीय अधिकारी धाराशिव


2) तहसीलदार तुळजापूर


3) ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय सिंदफळ ता. तुळजापूर


  इत्यादी अधिकाऱ्यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा