*ज्येष्ठ ,पञकार- श्रीपूर*
*बी.टी.शिवशरण
नरेंद्र मोदी हे आज तीसरे वेळी पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत त्यांच्या मंत्रीमंडळात आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना स्थान देण्यात आले आहे आठवले हे सुध्दा तीसरे वेळी मंत्रीपदाची शपथ घेत आहेत आठवले यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने आरपीआयच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे ते जल्लोष करत आहेत एकीकडे हा आनंद असला तरी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी न दिल्याने आरपीआयच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी आहे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत राजाभाऊ सरवदे यांना तिकीट नाकारल्याचे शल्य अद्यापही कार्यकर्त्यांच्या मनात आहे कार्यकर्त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या आहेत की राजाभाऊ सरवदे यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री करावे केंद्रीय मंत्रीमंडळ शपथविधी नंतर पुढील दहा दिवसांत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत आहेत तेव्हा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करुन राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राजाभाऊ सरवदे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी घटक पक्ष असलेल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलणी करून सरवदे यांचा त्यांचे चळवळीतील पक्षातील सामाजिक राजकीय योगदान पाहून त्यांचा सन्मान करावा अशी जोरदार आग्रही मागणी करण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा