*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मोबाईल ॲप हे ऐतिहासिक पाऊल असून संस्था संपूर्ण संगणकीकृत होण्यामुळे सभासदांचा विश्वास दृढ होण्याबरोबरच संस्थेची पत ही उंचावेल.असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी केले.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने आयोजित केलेल्या संस्थेच्या मोबाईल ॲप लॉन्चिंग आणि सेवानिवृत्त सन्मान समारंभामध्ये अकलूज येथे बोलत होते.मनोगतातून त्यांनी पतसंस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुकही केले.यावेळी प्रगतशील बागायतदार अशोक मगर, सुप्रसिद्ध लेखक पवार,सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधीर नाचणे,जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीमंत गुंड, सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रदीप पिसे, अनिल अन्नदाते,ज्ञानेश्वर मस्के, पतसंस्थेचे माजी चेअरमन दिलीप ताटे,हनुमंत खताळ,रमेश सरक, विठ्ठल सावंत,अशोक रुपनवर, संतोष रुपनवर,आप्पा खरात, संस्थेचे चेअरमन अशोक पवार, व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर मिसाळ, संचालिका दमयंती मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रस्ताविकातून संस्थेचे चेअरमन अशोक पवार यांनी पतसंस्थेने दीड वर्षांमध्ये राबविलेल्या विविध योजना आणि धोरणांचा आढावा घेताना संस्थेच्या कामकाजात गतिमानता,विविधता,अचूकता आणि पारदर्शकता आणण्याच्या कामी संस्थेचे मोबाईल ॲप बहुमोल ठरेल असे सांगितले.
सॉफ्टवेअर डेव्हलपर पिसे यांनी ॲपमधील विविध फीचर बाबत माहिती दिली.सेवानिवृत्त शिक्षकांना पतसंस्थेची जोडून ठेवणाऱ्या पतसंस्थेने सुरू केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मान उपक्रमात २२ सेवानिवृत्तांचा सन्मान प्रमुख पाहुणे मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडला. पतसंस्थेने घेतलेल्या या कृतज्ञतापूर्ण उपक्रमाचे सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सुधीर नाचणे यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी परिवाराचे मार्गदर्शक मंडळ,विविध संघटनांचे पदाधिकारी,संस्थेचे माजी चेअरमन,व्हा.चेअरमन,सभासद उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक आप्पा खरात,विजय शिंदे,राजेंद्र उकिरडे,राम काटकर,पांडुरंग मोहिते,आत्माराम गायकवाड, अण्णासाहेब मगर,दमयंती मांडवे,शामतबी मुल्ला, बाळासाहेब शिंदे,संदीप जाधव
सचिव सतीश दिवटे,सहसचिव गणेश गोखले कर्मचारी लक्ष्मण धोत्रे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक राम काटकर यांनी केले.
*विशेष*
*संपूर्ण संगणकीकरण आणि संस्थेचे मोबाईल ॲप लॉन्च करणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली शिक्षक पतसंस्था म्हणून सहकार नगरी अकलूजमधील माळशिरस तालुका शिक्षक पतसंस्थेचे नाव कोरले जाईल. मदनसिंह मोहिते पाटील सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज*
*उत्कृष्ट संस्थेची असणारी मानके अचूकता, गतिमानता, विविधता, पारदर्शकता आणि उपयोगिता पूर्ण करणारी संगणक प्रणाली आणि संस्थेचे मोबाईल ॲप संस्थेच्या वाटचालीतील माइल स्टोन ठरतील.*
*अशोक पवार*
*चेअरमन,माळशिरस तालुका शिक्षक पतसंस्था.*
......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा