Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ जून, २०२४

*माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दाखले शिबिराचे आयोजन*

 


*संपादक ---हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो ;-9730 867 448

महाराष्ट्र शासन अंतर्गत तहसिल कार्यालय माळशिरस यांचे मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरीता आवश्यक असणारे विविध दाखले उपलब्ध करून देणे करता विशेष शिबीराचे आयोजन दिनांक - १३/६/२०२४ वेळ सकाळी ११ ते ५ या वेळेत मंडल अधिकारी कार्यालय सदाशिवनगर व तलाठी कार्यालय सदाशिवनगर येथे आयोजित केले होते. यामध्ये उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, जमीन नसल्याचा दाखला, दाखल्याबाबत सर्कल चौकशी अहवाल, रेशन कार्ड युनिट दाखला असे दाखले काढण्यात आले.



 तसेच तहसिल मार्फत मिळणारे दाखले या ठिकाणी वाटप करण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी एस आर दराडे, सदाशिवनगर चे ग्रामसेवक प्रशांत रूपनवर, तलाठी एस आर चवरे, मांडवे चे तलाठी पी जी उदगावे, पुरंदावडेचे तलाठी एस एम गुंजाळ, भांबूर्डी चे तलाठी ए व्ही सूर्यागण तसेच सदाशिवनगर, मांडवे, गिरवी इत्यादी गावांचे महा ई सेवा केंद्र मांडवे, लोणंद, सदाशिवनगर, कोतवाल, सदाशिवनगर ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य , कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांना दाखले देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा