Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जुलै, २०२४

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्या मध्ये गळीत हंगाम 2024 /25 करिताचे मिल रोलर पूजन संपन्न*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२४-२५ करीता मील रोलरचे पूजन कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

            कारखान्याचे मार्गदर्शन संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.





            गळीत हंगाम २०२४-२५ चालू करण्याच्या दृष्टीने कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हाॅलींगची कामे प्रगतीपथावर असून शेती विभागामार्फत ऊस तोडणी,ऊस वहातुकीचे करार सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी दिली.

             कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये १० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यासाठी कारखाना कार्य क्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासद यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यानी केले.



         ‌ ‌‌या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख,संचालक लक्ष्मण शिंदे,सतिश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे,विजयकुमार पवार,विराज निंबाळकर,महादेव क्षिरसागर,अमरदिप काळकुटे, गोविंद पवार,जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे,तज्ञ संचालक रामचंद्र सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे, शिवसृष्टी किल्ला व शिव छत्रपती मल्टीमेडिया लेजर शो कमिटीचे संचालक पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण,विनायक केचे, राजेंद्र भोसले,धनंजय सावंत, नामदेव चव्हाण व सौ.हर्षाली निंबाळकर तसेच सर्व खाते प्रमुख, कामगार व युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा