*विशेष ---प्रतिनिधी*
*राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.8408 817 333
दिनांक १२/०७/२०२४ रोजी सकाळी अकलुज पोलीस ठाणे हद्दीत श्री. संत जगतगुरु तुकाराम महाराज पालखीचे आगमन होत असून सदाशिवराव माने विदयालय येथे गोल रिंगण व मुक्काम आहे. दिनांक १३/०७/२०२४ रोजी सकाळी माळीनगर येथे उभे रिंगण व बोरगांव मुक्काम आहे. सदर पालखी सोहळयाकरीता पोलीस प्रशासनातर्फे अकलुज पोलीस ठाणे हद्दीत एकुण पोलीस अधिकारी ३० (त्यात अपर पोलीस अधीक्षक-१, पोलीस उपअधीक्षक-२, पोलीस निरीक्षक ६, सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक-२०, महिला पोलीस उपनिरीक्षक-२), पुरुष अंमलदार ३२५, महिला पोलीस अंमलदार २०, पुरुष होमगार्ड २१५, महिला होमगार्ड ६० असा एकुण ६५० पोलीस बंदोबस्त, १ एस.आर.पी.एफ. प्लाटून, १ बी.डी.डी.एस. पथक, १ मिसींग सेल पथक, १ नियंत्रण कक्ष, गुन्हे प्रकटीकरण शाखा पथक, तपास पथक अशी पथके तैनात केली आहेत. तसेच महाविद्यलयीन एन.एस.एस. व एन.सी. सी. चे विदयार्थी तसेच पोलीस पाटील व पोलीस मित्र, ग्रामरक्षकदल यांचाही सहभाग आहे. वाहतुक सुरळीत राहण्याकरीता पोलीस अधीक्षक सो। यांनी यापुर्वीच जाहीरनामा प्रसिध्द केलेला असून वाहतुक कर्मचारी नेमण्यात आलेले असून बेरिकेटींगची व्यवस्था केलेली आहे. सदरचा पालखी सोहळयामध्ये भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याकरीता चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पालखी सोहळा शांततामय वातावरणात संपन्न व्हावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.
(भानुदास निंभोरे) पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा