*नातेपुते ----प्रतिनिधी*
*श्रीकांत बाविस्कर
नातेपुते येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांना विविध संस्थाकडून अल्पहाराचे वाटप
करण्यात आले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा निमित्त पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांना नातेपुते येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या प्रेरणेने संदीप ठोंबरे मित्र मंडळ यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अलकार म्हणून पोहे व बिसलरी ची बॉटल चे वाटप करण्यात आले
नातेपुते येथील आर आर ग्रुप च्या वतीने दहीगाव चौक येथे वारकऱ्यांना खिचडी वाटप करण्यात आले
तसेच नव्या दिव्या बहुउद्देशीय सामाजिक संस्था नातेपुते यांच्या वतीने बिसलरी पाणी बॉटल व बिस्किट वाटप वारकरी संप्रदायांना शंभू महादेवाच्या मंदिराजवळ करण्यात आलेतसेच नातेपुते येथील नातेपुते सराफ असोशियनच्या वतीने वारकऱ्यांना पीठलं भाकरीचे जेवण देण्यात आले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा