इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासात बावडा येथे आला असता तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. पालखीचा आज वडापूरी येथे मुक्काम आहे.
यावेळी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. मोरे महाराज तसेच पालखी रथाच्या बैल जोडीचे मानकरी श्री. खांदवे यांचा सत्कार सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक महादेवराव घाडगे यांनी बावडा ग्रामस्थांच्या वतीने केला. या प्रसंगी शंकर घाडगे, प्रधान आगलावे, अंकुश घाडगे, रणजित घाडगे, सदाशिव कदम, दत्तात्रय देवकाते, सुयश लोखंडे, रमेश गायकवाड उपस्थित होते.
पालखीचे बावडा गावात आगमन होताच महिला, भाविक, भक्तांनी तोफांची सलामी देत दर्शन घेतले. दर्शन व स्वागतानंतर पालखीचे प्रस्थान झाले. आज वडापूरी येथे पालखीचा मुक्काम आहे.
फोटो - बावडा थयेथील राजर्षी शाहू महाराज चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा