*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मनापासून वाटते आपण घ्यावा जन्म पुन्हा!
आपल्या आदर्श विचारांची
पहा कशी तोडफोड होतेय
गरीब मावळ्यांच्या महिलांवर लाठीचार्ज होतोय
परस्त्री मातेसमान मानावे
अशी शिकवण आपण वर्तणुकीतून आम्हास दिली
परंतु या आदर्श विचाराचा विसर पडलेला दिसतोय
म्हणून वाटते... राजे आपण घ्यावा जन्म पुन्हा
मुस्लिम मावळ्यांसाठी आपण रायगडावर मशीद बांधली परंतु ती आता खुप्तेय धर्म द्वेषठ्या कर्मठांच्या डोळ्यात .
इतिहासात एकही पुरावा नाही सापडत , कोण्या मुस्लिम मावळ्याने गद्दारी केल्याचा , मग इमानदारीचे फळ असे का ?
अत्याचार अन्याय आपण कधीच खपवून घेतला नाही
धर्म द्वेष तर मुळीच केला नाही .परंतु सत्तापीपासू राक्षस आपले नाव घेऊन दीन दुबळ्यांवर ,महिलांवर अत्याचार करतायत पहावत नाही हा अन्याय होतोय
म्हणून वाटते राजे. ..आपण
घ्यावा जन्म पुन्हा .
सिद्धी हिलाल आणि त्यांचे चार पुत्र विशालगडावर स्वराज्यासाठी कुर्बान झाले त्यावेळी राजे आपण कुर्बान पुत्रास कवटाळून
म्हणाला होता ... बंधुनो स्वराज्य तुमचे बलिदान कदापि विसरणार नाही
पण.. राजे आज विसर पडलाय हो तुमच्या मुस्लिम मावळ्यांच्या बलिदानाचा .
म्हणून वाटते राजे ....
आपण घ्यावा जन्म पुन्हा.
नूरजहाँ शेख
गणेशगांव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा