Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ जुलै, २०२४

*डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघात 5 भाविकांचा मृत्यू*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या एका खासगी बसला पनवेलजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 42 जण जखमी झाले असून त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ही बस मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना बस एका ट्रॅक्टरला धडकली व त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल खड्ड्यात पलटली. बस थेट खाली असलेल्या पाईपलाईनवरच धडकल्याने बसमधील सर्वच प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे उपचारादम्यान पाच जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये एका महिलेचा व चार पुरुषांचा समावेश आहे. गुरुनाथ बापू पाटील, रामदास नारायण मुकादम, हौसाबाई पाटील अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे असून अद्याप दोघांची ओळख पटलेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा