Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० एप्रिल, २०२६

*करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्प उजवा व डावा कालव्यावरील अनधिकृत सायफन वर व पाणी चोरी वर कारवाई करणार-- शाखाधिकारी,अरुण कांबळे*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


पाटबंधारे उपविभाग करमाळा

पाटबंधारे शाखा क्रमांक एक ची शाखा अधिकारी यांनी अनधिकृत विनापरवाना सायफन वर कारवाई करणार असल्याचा इशारा पत्रा द्वारे दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे ं

पाटबंधारे उपविभाग करमाळा अंतर्गत मांगी मध्यम प्रकल्पावरील उन्हाळी आर्वतन सोडण्यात येत आहे तरी, उजवा व डावा कालव्यांवरील अनाधिकृत विनापरवानगी सायफन पाईप लावणे, तसेच पाणी चोरी करणे, पाण्याचा अपव्यय करणे, हे या शाखा कार्यालयाच्या निदर्शनास आले असून, याबाबत शासनाच्या आदेशानुसार अनाधिकृत विनापरवानगी सायफनवर या शाखा कार्यालयाकडून प्रशासकीय कार्यवाही करून, संवधीत अनाधिकृतपणे पाणी चोरनाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून सदर सायफन पाईप जप्त करण्यात येतील. तरी मांगी मध्यम प्रकल्पावरील उजवा व डावा कालव्यांवरील अनाधिकृत सायफनधारकांना पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे



शाखाधिकारी पाटबंधारे शाखा क्र.१ करमाळा

अरुण कांबळे.

7447242125

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा