*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
कोडोली (ता.पन्हाळा) येथील प्रा.नितीन राजाराम कळंत्रे यांची श्री यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय,वारणानगर येथे कला शाखा समन्वयक या पदावर ३१ वर्षे सेवा पुर्ण होऊन सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा.नितीन राजाराम कळंत्रे यांच्या सेवा समाप्ती सोहळ्यामध्ये महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ.डी.आर.धेडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.पी. एस.चिकुर्डेकर,महाविद्यालयाचे प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, प्रा.डॉ.पी.एस.राऊत उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.एस.जी. जांभळे यांनी केले.प्रा.डॉ.पी.एस. राऊत,प्रा.मधुकर सुतार,प्रा.डॉ. राजेंद्र पाटील (तिसंगी ),डॉ. मिलिंद हिरवे प्रा.नारायण सनगर, सौ.प्रज्ञा गायकवाड,मालेगावचे सरपंच आबाजी पाटील, बाबासाहेब पाटील (माले),श्री. ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे संस्थापक शिवलिंग कळंत्रे सर, सौ.आज्ञा कळंत्रे,चि.विरेंद्र कळंत्रे यांनी मनोगते व्यक्त केली.
पन्हाळा शाहूवाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार नशिबात विनय रावजी कोरे सावकर यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून प्राध्यापक नितीन राजाराम कळंत्रे यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास कळंत्रे सरांचे विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा.डॉ. आर.बी.पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा