*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या दिनांक 24/01/2020 रोजीच्या पत्राद्वारे केलेल्या शिफारशीवरून आणि पाठपुराव्यामुळे राज्य मार्ग क्रमांक 238 ते नीलेगाव ते देवसींगा नळ असा 5.2 किमी च्या रस्त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली.असुन गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मिटला आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिफारशीमुळे अखेर 7 कोटी 76 लाख 36 हजार रुपये पि.एम.जी.एस.वाय व मुख्यमंत्री.जी.एस.वाय. च्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. खासदार साहेबांच्या शिफारशीनंतर गेल्या 4 वर्षापासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने च्या कोर नेटवर्क मधील टप्पा दोन (२) मध्ये हा रस्ता समाविष्ट करण्यासाठी दिनांक 09/03/2022 रोजी मी मुख्य कार्यकारी अभियंता यांना केलेल्या पत्र व्यवहारामुळे व सातत्याने पाठपुरावा केल्याने सदर रस्त्याची प्रशासकीय मान्यता प्राप्त व्हायला मदत झाली. त्याचबरोबर देवसिंगा नळ चे तत्कालीन उपसरपंच शब्बीर शेख व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने ग्रामपंचायत ठराव मंजूर करून सदर रस्त्याची मागणी केली होती. या रस्त्यामुळे निलेगाव, देवसिंगा (नळ) व शेजारील गावातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे.
सदर रस्त्याच्या मंजुरीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सतत च्या प्रयत्ना मुळे आणि मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांचे निलेगावा आणि देवासिंगा सर्व ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा