*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ येथे बुधवार दि.17 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दिंडी सोहळ्यात गावातील भजनी मंडळ तसेच शाळेतील बालगोपाळांनी महाराष्ट्रीयन संत संस्कृतीचे दर्शन पाहुण नेत्र दीपक जवळून पाहायला मिळाले. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात तल्लीन होऊन सर्व विद्यार्थी ,शिक्षक या दिंडी सोहळ्यात आनंदमय वातावरणात सहभागी झाले होते. पालखीची सुंदर अशी आकर्षक सजावट शाळेतील गडेकर मॅडम, मोरे मॅडम, चव्हाण मॅडम, जाधव मॅडम, राजगुरू मॅडम या सर्वांनी मिळून केले. या दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण गावात एक भक्तीमय वातावरण आणि वारकरी सोहळ्याचे दर्शन दिसून आले. या दिंडी सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक शेख एस.एम. शिक्षक पवार सर, मुलाणी ए.जे तसेच गावातील समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ आनंदाने सहभागी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा