*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ ता. तुळजापूर येथे कोविजन फाउंडेशन तुळजापूर यांच्याकडून दिलेल्या १०० वृक्षाचे वृक्षरोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कोविजन फाउंडेशनने विविध औषधी वनस्पती, प्राणवायू देणारी झाडे ,फळांची झाडे, शोभेची झाडे शाळेला भेट दिली. वृक्ष लागवडीचे महत्त्व व वृक्षांचे फायदे व योजना फाउंडेशनचे समन्वयक यांनी सांगितले. मुलानी सर यांनी वृक्ष लागवड कशी करावी व त्याची निगा कशी राखावी याचे महत्त्व सांगितले. ज्या विद्यार्थ्यांची वृक्षाची वाढ , जोपासना पुढील वर्षी पर्यंत चांगली असेल त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल. यावेळी बाबूरावअप्पा ठोंबरे, सरपंच शहाजी अण्णा सुपणार, उपसरपंच राजकुमार वट्टे, शा.व्य.समिती अध्यक्ष मन्मथ ठोंबरे, कमलाकर ठोंबरे, रतन मुदगुडे, सुनिल नवगीरे,पोलीस पाटील शिवाजी सगर, गणपती कुंभार,केंद्रप्रमुख लोखंडे एस.एस, मुख्याध्यापक शेख एस.एम,पवार बी.टी, मुलाणी ए.जे,मोरे एन.एस,जाधव एस.के,गडेकर आर. एस,वाघमारे एस.व्ही,चव्हाण के.एच,राजगुरू एम.आर, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा