*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आषाढी वारी निमित्त पंढरपूर ला पांडुरंगा च्या भेटीला देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी तर आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत काल
माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळ्यामध्ये काल वेळापूर या ठिकाणी मुक्कामी होती या पालखी मधील वैष्णवांची सेवा घडावी म्हणून बार्शी येथील ज्येष्ठ समाज बांधव धनंजय ताटे. यांनी वेळापूर येथे वारकऱ्यांना मोफत कपड्याची इस्त्री करून देण्याची सेवा करणारे चि. आदित्य काटकर. यांचा धनंजय ताटे यांनी हार श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी अकलूज येथील शांतीलाल कारंडे उपस्थित होते. मोफत इस्त्री करून देण्यामुळे सर्व वारकरी भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला. आणि वारकरी भाविकांनी त्यांचे आभारी मानले तसेच आदित्य काटकर च्या
पुढील कार्यास धनंजय ताटे यांनी शुभेच्छा दिल्या
जय गोपाला
मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा
राष्ट्रसंत गाडगे बाबा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा