*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लेखक इंद्रजीत पाटील लिखित ' शेलक्या बारा ' या सुप्रसिद्ध कथासंग्रहास अल्पावधीतच तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी ( काळगाव ) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,महाराष्ट्र राज्य या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला.संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष संदीप डाकवे,उपाध्यक्ष आप्पासाे निवडुंगे,सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत सर्वानुमते हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या आधी सदर कथासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य परिषद,नागपूर व तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे चा सर्वाेत्कृष्ट कथासंग्रह राज्यस्तरीय पुरस्कार -२०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे.
ग्रामीण बाेलीभाषेचा साज अन् बाज असलेल्या या कथासंग्रहास महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी लेखक इंद्रजीत पाटील यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा