*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार सभेदरम्यान गोळीबार झाला. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक एका व्यक्तीने गोळीबार सुरू केला. या गोळीबारातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. गोळी त्यांच्या उजव्या कानाला लागली. ही गोळी 2 सेंटीमीटरनेही आत गेली असती तर ट्रम्प यांना आपला जीव गमवावा लागला असता. या संदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान संशयित बंदूकधाऱ्याला ठार करण्यात आले आहे. अजून गोळीबार करणाऱ्याची ओळख पटलेली नाही.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या कानाला गोळी लागली. त्यानंतर उजव्या कानातून रक्त येऊ लागले आणि चेहऱ्यावरही रक्ताच्या खुणा दिसत होत्या. ते पेनसिल्व्हेनियामध्ये तो रॅलीत असताना एकामागून एक गोळ्या झाडण्यात आल्या. पहिली गोळी झाडताच ट्रम्प म्हणाले, ‘अरे’ आणि आणखी दोन गोळ्यांचा आवाज आला. यानंतर ट्रम्प खाली वाकले. हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, त्यांच्या कानातून गोळी गेल्यासारखे वाटले. हल्ल्यानंतर ट्रम्प काही वेळातच उठले. ते त्यांचा उजवा हात चेहऱ्याकडे वर करताना दिसत होते. त्याच्या चेहऱ्यावर रक्त होते. जेव्हा तो परत उठले त्यांनी आपल्या मुठी आवळल्या तेव्हा जमावाने घोषणा सुरु केल्या.
व्हाईट हाऊसने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स सेक्रेटरी सर्व्हिसेस डायरेक्टर किम्बर्ली चीटल, होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी अलेजांद्रो मेयोर्कस आणि व्हाईट हाऊस होमलँड सुरक्षा सल्लागार लिझ शेरवुड-रँडल यांच्याकडून त्यांना घटनेची माहिती दिली गेली. सीक्रेट सर्व्हिसकडून या घटनेवर सांगण्यात आले की,ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प मंचावरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅलीचे मैदान रिकामे केले. सीक्रेट सर्व्हिसने या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान, एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. या प्रकरणाच्या तपासात ही टीम सीक्रेट सर्व्हिससोबत काम करेल, असे एजन्सीने म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर म्हटले आहे की, अमेरिकेत असे काही घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल मला कोणतीही माहिती नाही, जो आता मरण पावला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. मला लगेच कळले. काहीतरी गडबड होतेय. कारण मला मोठा आवाज ऐकू आला, गोळ्या झाडल्या गेल्या आणि लगेच रक्तही आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा