*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*मुंबई ;--बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून त्याची तब्बेत बरी नव्हती. त्यानंतर अक्षय कुमारने कोविड टेस्ट केली त्यावेळी त्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. अक्षयला कोरोना झाल्याची माहिती त्याच्या टीमने दिली आहे.
अक्षय कुमार मागील काही दिवस आपल्या सरफिरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त होता. प्रमोशन टीमच्या काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने अक्षयची देखील कोविड 19 टेस्ट करण्यात आली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार चा चित्रपट सरफिरे 12 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अभिनेत्याने मोठ्या उत्साहात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. पण दुर्दैवाने आता तो चित्रपटाच्या प्रमोशनच्या अंतिम टप्प्यात सहभागी होऊ शकणार नाही. तसेच, तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नाचा भाग होऊ शकणार नाही.
कारण, अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. अभिनेत्याने स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. अक्षयला त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी अनंत अंबानी स्वतः त्याच्या घरी आले होते. मात्र, आता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यानंतर या कार्यक्रमात तो उपस्थित राहणार नाही. अक्षय कुमार त्याचा चित्रपट सरफिराच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होता. यावेळीच त्याला अस्वस्थ वाटत होते. प्रमोशनल टीमशी संबंधित काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला बाकीच्या टीमकडून कळले, तेव्हा अक्षय कुमारनेही कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अंदाज खरा निघाला. त्यालाही कोरोनाची लागण झाली असून तो आता योग्य ती खबरदारी घेत आहे. शुक्रवारी सकाळी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि त्यादरम्यान त्याने स्वत:ला पूर्णपणे वेगळे केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा