Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ जुलै, २०२४

*पुसेसावळी ते विशाळगड हिंसक उद्वेगाचे हे अमर्याद दृष्ट चक्र कधी थांबणार??*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

  *सांगली*

 *मो ;--8983 587 160

14 जुलै रोजी विशाळगडावर निषेधार्ह हिंसाचार झाला .एक वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील पुसेसावळी येथे जातीय धर्मांध शक्तींकडून हिंसाचार करण्यात आला होता . एका मुस्लिम असणाऱ्या "नुरुलहसन शिकलगार" या निष्पाप तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या पत्नीला विधवा आणि पत्नीच्या गर्भात असणाऱ्या बाळाला "पोरकं" करणाऱ्या दंगेखोरांनी विशाळगड मध्ये हिंसक कृती केली .दर्ग्यात तोडफोड केली ,मस्जिद ची नासधूस केली. गॅस सिलेंडर चे स्फ़ोट केले, गाड्या - दुकानांची तोडफोड केली. महिला - मुलांना मारहाण केली. 

आज सर्व "हिंदू - मुस्लिम" गुण्यागोविंदाने नांदत असताना दंगेखोरांची ही कृती "अमानवीय दृष्टीकोन" आणि माणुसकीला काळिमा फासणारी ठरत आहे. 

प्रत्येक वेळी मुस्लिमच टारगेट का ??? मुस्लिम असणे हा दोष किंवा "गुन्हा" आहे का ??? 14% असणाऱ्या भारतातील मुस्लिमांबद्दल जातीयवाद्यांना इतका "आक्षेप" आणि आकस का ???

पुसेसावळी ते विशाळगड हिंसक उद्वेगाचे हें अमर्याद दुष्ट्चक्र कधी थांबणार ??? 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या "विचारांचे" खरे "वारसदार" कधी निर्माण होणार ???*



 स्वातंत्रसेनानी हजरत टिपू सुलतान यांनी दलित महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार दिला. एका मुस्लिम घराला आग लागलेली असताना शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचे पवित्र कुराण आपल्या "छातीशी" कवटाळत ते सुरक्षितपणे मुस्लिमाना स्वाधीन केले. त्याच क्रांतिवीर आणि सर्वधर्मसमभावाचे पाईक असणाऱ्या थोर शिवरायांचे अनुयायी आज हिंसाचार करून काय सिद्ध करत आहेत ??? केवळ "राजकीय लाभासाठी" मुस्लिमाना मोहरे बनवणे किंवा लक्ष करणे भविष्यात बंद व्हायला हवे .

18 पगड जातींशी एकनिष्ठ असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे हें दंगेखोर खरे वारसदार असू शकतात का ???

महिला - लहान मुलांवर हल्ला करणारे ,घराची "कुलपे" फोडून दरोडेखोराप्रमाणे आत घुसून जीवनावश्यक साहित्याची नासधूस करणारे , किराणामालाची दुकानें लुटणारे, मशिदी मध्ये घुसून मस्जिद अपवित्र करणारे, मशिदीची "नासधूस" करणारे , माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी होऊ शकतात का ??? "मानवतावादी" दृष्टीकोन "पायदळी" तुडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नावं घेऊन हिंसाचार करून कोणी शिवभक्त होऊ शकतात ???.

♦️ "अल्लाह" मुस्लिमांच्या हृदयात ..मस्जिदची "तोंडफोड" करून काय "साध्य" करणार ??*

14 तारखेला विशालगडावर भीषण हिंसाचार झाला. घरांची मोडतोड झाली , हजरत रेहानबाबा यांच्या दर्ग्यावर - मस्जिदवर हल्ला केला गेला. कोणीही कितीही गोंधळ घातला तरीही परंतु सर्वशक्तिमान "अल्लाह" प्रत्येकाच्या मनात - हृदयात आहे ,कुराण शरीफ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना तोंडपाठ आहे . त्यामुळे ते कोणी "हिरावू" शकत नाही. 

"जातीय उद्रेक" करण्याचा जातीयवाद्यांच्या उद्देश काहीअंशी सफल झाला असला तरीही हिंदू -मुस्लिम यांचा "हजारो" वर्षांपूर्वीचा " सांस्कृतिक मिलाफ जातीय शक्ती कधीच "नष्ट" करू शकणार नाहीत . कितीही प्रयत्न झाला तरीही ...."हिंदू -मुस्लिम " एक होते ...आणि एकच राहणार ! 

 *राजे ही उपाधी आहे ???*


 एखाद्याने "राजे" हें नावं लावले म्हणून कोणी "राजे" होत नाही, कारण त्यासाठी विचारांची शिदोरी - आणि जनसामान्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात ,त्यांचे श्राप नाही! आणि राजाने प्रजेशी "राजासारखे" राहावं लागत . छत्रपती शिवाजी महाराज हें जनसामान्यांचे "हितरक्षक", गरजवंतांचे "पालनहार" आणि गरिबांचे "मसीहा" होते. सर्वधर्मसमभावाचे खरे "प्रणेते" आणि जगजेते होते ,जगातील सर्वात आदर्श आणि परिपूर्ण "राजे" होते .

शिवाजी महाराजांनी जनतेच्या "हिताचे" राज्य केले, ज्यांचा समस्त "मुस्लिमाना" सार्थ "अभिमान" आहे .

शिवाजी महाराज आपल्या प्रजेचे संरक्षण करणारे, प्रजापती "दक्ष" राजा होते . दंगल घडवणारे, गरिबांच्या घरातील लोकांना मारहाण करणाऱ्या ,कौटुंबिक साहित्य घराबाहेर फेकणाऱ्या ,दुकानांची लूट करणाऱ्या दंगलखोरांना संरक्षण देणारे आजच्या 2021 च्या शतकात कोणी "राजा" होऊ शकत नाही.

 आगामी विधानसभेसाठी ,मतांसाठी विशाळगडावरील हा "राडा" असेल का* ?? पक्षश्रेष्ठीच्या" गुड बुक "मध्ये आपले नावं कोरलं जावे , आपली दखल घ्यावी म्हणून देखील हा विध्वंस केला गेला नसेल ना ??? भलेही हिंसाचाराला त्यांचे "समर्थन" नसेल,परंतु पोलीस अधीक्षक - आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून समयोचित मार्ग काढता आला असता. विशाळगडवर जे "अतिक्रमण" आहे ते सर्व काढायलाच हवे. त्याबद्दल कोणाचेही "दुमत" नाही .तरीदेखील झालेल्या प्रकारातून राजकीय पुनर्वसन हा एकच मुद्दा विशाळगड हिंसाचारातून प्रतिबिंबित होताना दिसत आहे एवढे मात्र निश्चित !


विशाळगड हिंसाचाराची "चौकशी" व्हावी !


विशाळगडच्या दुर्दैवी हिंसाचाराची चौकशी व्हावी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुस्लिम समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते शाकीर तांबोळी , असिफ बावा , जैलाब शेख ,अश्रफ वांकर ,युसूफ (लालू) मेस्त्री ,सुफियान पठाण आदींनी जिल्हाधिकारी व कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षक यांना निवेदन दिले आहे . 

भविष्यात असे "दुर्दैवी" प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी विशेष प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे . हाय होल्टेज प्रकरणात , प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष असेल तर कधीच अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत हें निश्चित !             

       

. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

(*पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा