*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
विशाळगड व गजापुर येथील दंगली बाबत व कोल्हापूर चे पोलिस अधीक्षक जातीय दंगल रोखण्यात अपयशी झाल्याबद्दल त्यांची बदली करणेबाबत.
जमियत उलमा ए शहर कोल्हापूर यांनी पोलिस महानिरीक्षक ,कोल्हापूर परिक्षेञ
यांना निवेदन सादर केले असुन त्याचा संदर्भ पुढील प्रमाणे
महोदय ,
14 जुलै 2024 रोजी छत्रपती संभाजी राजे व त्यांच्या दंगेखोर अनुयायी जे स्वतःला शिवभक्त म्हणवतात या सर्वांनी मिळून जो विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जो विध्वंस केला तो कोल्हापूर आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सरवधर्म समाभावच्या पवित्र्याला काळीमा फासणारा आहे.अतिक्रमणाचा नावाखाली प्रभू श्री राम,तर कधी महादेव,भवानीमाता,आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत लोकांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची नासधूस,गाड्या फोडणे,महिलांना व लहान मुलांना दहशत दाखवून मारहाण करणे,त्यांच्या घरा ना आगी च्या भक्ष्य करणे,आणखी त्या मध्ये मशिदी ची नासधूस व मशिदीची शक्य तितकी विटंबना,पवित्र मुस्लिम धर्म ग्रंथाची नासधूस हे सोशल मीडिया द्वारे वीडियो तून पाहताना मुस्लिम धर्मियांची काय अवस्था काय झाली असेल?याची कल्पनाच केलेली बरी.
आणखी त्यात भरीस म्हणजे "सदरक्षणाय खल निग्रंहनाय"है ब्रीद घेऊन जनतेच्या रक्षकांच्या समोर अगदी त्यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रकार पाहतात पण ते हतबल आहेत. हे सर्व प्रकार काही सकाळी 8:45 ते दुपारी 4:00 य वेळेत सोयीस्कर पणे पाडतात,आणि तदनंतर पोलिसांचा कारवाई चा फार्स सुरू होतो,एखाद्या हिंदी चित्रपटातील दृश्य सारखा.य संपूर्ण प्रकरणा विषयी आम्हाला जे प्रश्न पडलेले आहे त ते म्हणजे,
1)साधारण 2/3 दिवस अगोदर सोशल मीडिया वर य प्रकरणी मॅसेज घुमत होते,त्यात मशीद , दर्गाशरीफ हेच त्यांचे लक्ष्य होते.पण पोलिसांच्या सायबर क्राईम ने त्याच्या बाबत कोणतीही कारवाई केली नाही,की कोणालाही अटक अथवा साधा गुन्हा दाखल झाला नाही
2)पुण्यातून एक जातीय वादाने बरबटलेले विध्वंसक दंगेखोर टोळी वेळोवेळी लोकेशन जाहीर करत विशाळगड कडे येत होती ,त्यांना कोणीही कसल्याही प्रकारे चौकशी करून रोखले नाही.त्यांच्याकडे कुदळ,खोरे, भाले,तलवारी अशी हत्यारे घेऊन जवळ पास 300 की.मी.चालत येतात ,त्यांना पोलिस का रोखत नाहीत,ते का ?हा संशोधनाचा विषय.
3)14 जुलै लां बंदोबस्ताचा आव आणणारे पोलिस त्यांना गडावर जाऊ कसे देतात ?
4)गडावरील विध्वंसक सोपस्कार पार पडल्या नंतर,गडाच्या पायथ्याला पुन्हा तोच प्रकार.
5)आता शेवटचा टप्पा म्हणजे गजापुर,येथे तर संपूर्ण 4 किलोमिटर अक्षरशःधुडगूस घालत पोहचतो.(वाटेत एक ही पोलिस नाही) अगदी निवांत पने मशिदीवर हल्ला होतो,तो योजना बध्ध सर्व हत्यारा निशी ,त्या नंतर गाड्या ,घरे,प्रापंचिक साहित्य,एका घराला आग लावणे ई.
6)त्यानंतर राजे येणे, प्रशासनाने लोटांगण घालून त्यांची खुशामत करणे,वगैरे.
सकाळ पासून 7 ते 8 तास चाललेल्या या अंकाची समाप्ती होते,संपूर्ण प्रकारत पोलिस कुठे आहेत.
वर्षभरापूर्वी झालेली दंगल ही अशीच पूर्व नियोजित होती,स्टेटस वरून दडलेली दंगल 144 कलम लागू असताना 10,20,50,100 करत करत हजारोंचा जमाव जमतो वर उल्लेख केलेल्या घोषणा देत बरोबर मुस्लिम समुदाय व त्याच्या मालमत्तेची हानी होते,144 कलम लागू असताना जमाव एकवट कसा ते ही पोलिस पहारा असताना,नंतर लाठीचार्ज ची कारवाई (देखावा)50 लोकांना अटक करून न्यायालयातून जामिनावर बाहेर ---- पहिला अंक समाप्त.
दुसरा अंक 14 जूलै,आता पाहूया पुढे काय?
साहेब,एकूण प्रकरणा वरून एका गोष्टीचा उलगडा होत नाही,तो म्हणजे देशात ,राज्यात,जिल्ह्यात लोकशाही जिवंत आहे काय?जर आहे तर मग ती कुठे आहे?संविधानाचा अंमल होत आहे काय?होत असेल तर कायदा सु व्यवस्था कठोर पने का राबविली जात नाही?कायद्यासमोर सर्व समान आहेत याची प्रचिती सर्वसामान्य माणसाला कधी येणार?सर्वच प्रकरणातील दोषींना कडकं शासन कधी होणार?असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
भविष्यात असे प्रकार होणार नाहीत य साठी कार्यक्षम पोलिस अधीक्षक आम्हाला हवा,जो कुणाचीही तमा न बाळगता अशा आणि सर्व प्रकारच्या गुन्हा आणि गुन्हेगाराला अळा घालेल.
तरी कृपया पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची कायमची बदली व्हावी,त्यांच्या काळात जातीय दंगे कधी नव्हे ते कोल्हापूरने पाहिले आणि ते ही भोगले ते सुध्दा फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाने.
साहेब य देशात ,राज्यात,कोणत्याही जिल्ह्यात भारतीय नागरिक म्हणून जगण्याचा हक्क आहे,तो अबाधित ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे
कृपया आमची विचाराधीन राहावी ही नम्र विनंती.
कळावे.
आपला विश्वासू मौलाना अझहर सैय्यद अध्यक्ष जमियत उलमा हिंद शहर कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा