*विशेष---प्रतिनिधी*
*राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
*देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे*
*घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे..!!*
*या उक्तीप्रमाणे आज दिनांक ४ जुलै २०२४रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट बिजवडी येथे मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज, खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील मित्र परिवार अकलूज, साहिल स्पोर्ट्स अकलूज यांच्या सौजन्याने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल, वह्या, लेखन साहित्य असे शालेय साहित्य देण्यात आले. मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे बिजवडी गावच्या सरपंच पूजाताई शिंदे व उपसरपंच वर्षाताई मदने यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. श्री व सौ संगीता दिलीप राऊत यांनी कै. सुरेश राऊत यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी पाच खुर्च्या भेट दिल्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच आदरणीय पूजाताई शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळेच्या समस्या सोडवण्याबाबत आश्वासित केले. खासदार पदी धैर्यशीलभैया मोहिते पाटील यांची निवड झाल्याबद्दल साहिल स्पोर्ट्स अकलूज यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना व पालकांना गोड खाऊ म्हणून मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले.*
*सदर कार्यक्रमासाठी स्वाती जाधव, दिपाली बंडलकर ,रोहिणी बंडलकर ,शहनाज नदाफ ,रुकसाना नदाफ ,वंदना भजनावळे ,रूपाली साठे, मालन जगताप, अश्विनी गरुड, रतन लोखंडे, सुवर्णा कांबळे अशा बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजमीर फकीर सर यांनी केले तर श्रीकांत राऊत सरांनी आभार व्यक्त केले.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा