Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जुलै, २०२४

*श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात टेंभुर्णी ची कु. संजीवनी कुटे रांगोळी रेखाटून करत आहे सेवा*

 


*अकलुज -----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळाचे पंढरपुरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.प्रत्येक जण या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आप आपल्या पद्‌धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतात. सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी (ता.माढा) येथील रांगोळी कलाकार कु.संजीवनी महावीर कुटे हिने संत तुकाराम महाराज पालखी समोर रांगोळीच्या पायघड्या काढण्याची सेवा करत आहे.विशेष म्हणजे रिंगण सोहळाची रांगोळी फक्त साडे पाच मिनीटात काढते.



           कु.कुटे या आपल्या रांगोळीच्या कलेमधून विविध सामाजिक संदेश देण्याचे काम करीत आहेत तसेच संत तुकोबांच्या चरित्रातील विविध चित्र ती रांगोळीतून रेखाटण्याचे काम करत आहे. या माध्यमातुन तुकाराम महाराजांचे चरित्र लोकांपर्यंत पोचवण्याचा तीचा हेतु आहे.



            हा प्रवास देहु ते पंढरपुर पर्यंत चालु राहणार आहे.यासाठी ६५० किलो रंगीत रांगोळी व ८०० किलो पांढरी रांगोळी वापरण्यात येत आहे.स्त्री शक्ती महिला मंच सदस्या कडून काही प्रमाणात रांगोळीची मदत देण्यात येते. कु.संजीवनी कुटे हिचा सेवेच दुसरे वर्ष असून या सेवेसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त मोरे महाराज यांचे देखील सहकार्य लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा