Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जुलै, २०२४

*"मेयोनीज " पिझ्झा ,बर्गर खाताय? सावधान हार्ट अटॅक होण्याचे संकेत !*

 


*सांगली ----पञकार*

*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

 *मो ;--8983 587 160

मेयोनीज मध्ये हानीकारक ओमेगा 6 फॕट एॕसिड

मेयोनीजचे "जंकफूड" खाणे हे "लहान मुले" आणि तरुणाईचे आवडीचे फास्टफूड होय . फास्टफूड - जंकफूड म्हणजे यांचा जीव की "प्राण ! 

परंतु याच मेयोनीज च्या अतिवापरामुळे भविष्यात "जीव"जाण्याची "वेळ" येते हे कित्येक लोकांना माहित नाही .

मेयोनीज मुळे कॅलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणात वाढते रक्तदाब वाढतो. अति मेयोनीज मुळे हार्टअटॅक येण्याची शक्यता बळावते. मेयोनीज मुळे लठ्ठपणा वाढतो .ओमेगा - 6 ऍसिड हे अशाप्रकारे शरीरास नुकसान करणारे ठरू शकते . गरम तव्यावर* मेयोनीज ठेवल्यावर ते मेवोनीज विरघळू शकत नसेल तर आपल्या शरीरात , "पोटात" गेल्यावर त्याचे काय होत असेल ???



मेयोनीज चा विळखा !

मोमोज, बर्गर -सॅन्डविच ,पिझ्झा , आणि विविध जंकफूड सोबत पांढऱ्या रंगाचे क्रीम ज्याला मेयॉनीज म्हणतात त्याला लहान मुलांसह , तरुणाईची सर्वाधिक पसंती असते . तथापि आपण जे पांढरे क्रीम खातो ते विष तर नाही ना ??? याची खात्री करण्याची आज वेळ आली आहे.

फास्टफूड मध्ये सर्वाधिक वापरला जाणारा हा मेयोनीज तेल आणि अंड्यापासून बनते. जंकफूड खाल्ल्यानंतर कित्येकांना "टॉयलेट" होणे किंवा विषबाधा च्या तक्रारी वाढतात . कित्येकवेळा डॉक्टरकडे जायचा प्रसंग येतो. कच्च्या अंड्यामध्ये साल्मोनेला बेक्टेरिया असतात . वास्तविक ,मेयोनीज एकदा शिळे झाले की हें विषाणू निर्माण होतात . विषबाधेमुळे संडास लागणे ,उलटी होणे,पोटात त्रास होणे ,चिडचिड होणे अशा व्याधी निर्माण होतात .

 नॉनव्हेजमध्ये मेयोनीज चा वाढता वापर

 हॉटेल मध्ये चिकन आणि मटण च्या विविध प्रकारात मेयोनीज चा वाढता वापर चिंताजनक ठरत आहे . कारण हॉटेलमध्ये विविध रेसिपी मध्ये याचा वापर केला जातो . "योग्य" प्रमाणात असणारे मेयोजिन त्रासदायक* नसते .परंतु नॉनव्हेजवर घालण्यात येणारे प्रमाणाबाहेर मेयोनिज घातक ठरू शकते .

      गरोदर महिलांसाठी घातक !

मेयोनीज खाणे गरोदर महिलांसाठी अतिशय घातक ठरू शकते . "कच्चे अंडे" असणारे मेयॉनीजमुळे गरोदर महिलांच्या "गर्भात" असणाऱ्या मुलाला अस्थमा होण्याची शक्यता असते .एक ग्रॅम मेयोनीज मध्ये 1 ग्रॅम "साखरेचे" प्रमाण असते हें ही लक्षात घ्यायला हवे .शरीर सदृढ आणि निरोगी ठेवायचे असेल तर "जिभेवर" आणि मेयोनीज वर "नियंत्रण" ठेवणे गरजेचे आहे .


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* ) 

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली .

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा