*उपसंपादक--नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील लवंग येथील ग्रामपंचायतीच्या वतीने लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची होणारी धावपळ व आर्थिक लूट थांबविण्यासाठी मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.हे शिबीर लवंग विविध कार्यकारी सोसायटी (२५/४) लवंग येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबीराला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण योजनाचे आयोजन करण्यात आले आहे.या योजनेत महिला वर्गातून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खूपच पळापळ होत होती.त्याच बरोबर अर्थिक लूट हि होऊ लागली असल्यामुळे लवंग ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,सदस्य व कर्मचारी वर्गांनी गावातील महिलांसाठी मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनाचे मोफत ऑनलाईन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये गावातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणात अर्ज नोंदणी केली.
हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी लवंग गावचे सरपंच प्रशांत पाटील,उपसरपंच प्रशांत भिलारे, पोलिस पाटील विक्रम भोसले , ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज वाघ,सज्जन दुरापे, सिताराम वाघ मोहन कांबळे ग्रामसेवक मोहन मिटकल, कोतवाल बाळासो सरवदे,प्रकाश गायकवाड ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी सहभाग घेऊन हे शिबीर यशस्वी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा